Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

परभणी हिंसाचाराच्या वेळी कोठडीत मृत्यू झालेल्या सोमनाथ सूर्यवंशी प्रकरणाच्या चौकशीसाठी एक सदस्यीय समिती

Spread the love

मुंबई : परभणी हिंसाचाराच्या वेळी कोठडीत मृत्यू झालेल्या सोमनाथ सूर्यवंशी प्रकरणाच्या चौकशीसाठीही निवृत्त न्यायाधीश व्ही एल आचलिया यांची एक
सदस्यीय समिती गठीत करण्यात आली आहे. सहा महिन्यात ही समिति त्यांचा अहवाल देणार आहे. या प्रकरणावर विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात निवेदन करताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणाच्या न्यायालयीन चौकशीची घोषणा केली होती. मात्र या संदर्भात पुढील आदेश निघाले नसल्याने विरोधक सरकारला लक्ष करत होते. आता अखेर या प्रकरणाच्या चौकशीसाठी एक सदस्यीय नियुक्ती करण्यात आली आहे.

परभणीमध्ये 10 डिसेंबर रोजी भारतीय संविधानाच्या प्रतिकृतीची विटंबना झाली होती. त्यानंतर परभणीमध्ये मोठा हिंसाचार उसळला होता. त्याच केसमध्ये सोमनाथ सूर्यवंशी या 35 वर्षीय वकील तरुणाला न्यायालयीन कोठडी देण्यात आली होती. पण कोठडीत असतानाच त्याचा मृत्यू झाल्याने या प्रकरणात सरकारवर मोठी टीका झाली. पोलिसांकडून करण्यात आलेल्या मारहाणीच्या धक्क्यामुळे सोमनाथचा मृत्यू झाल्याचं पोस्टमार्टेम अहवालात समोर आलं होतं. या प्रकरणाशी संबंधित पोलिसांना निलंबित करण्यात आलं आहे.

या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी आता व्ही एल आचलिया यांच्या अध्यक्षतेखाली एक सदस्यीय समिती गठीत करण्यात आली आहे. परभणीतील हिंसाचार आणि सोमनाथ सूर्यवंशी प्रकरणातील घडलेल्या घटनांचा क्रम, त्याची कारणे आणि परिणाम याचा अभ्यास या समितीकडून करण्यात येणार आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!