Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

NCPNewsUpdate : देशातील मोठा उद्योगपती प्रयत्नशील !! शरद पवारांची राष्ट्रवादी अजित पवारांच्या वाटेवर ?

Spread the love

मुंबई: सध्या देशातील आणि राज्यातील राजकीय स्थिति लक्षात घेता , शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस खासदार अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाटेवर असल्याचे बोलले जात आहे. देशातील एक मोठा उद्योगपती राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांनी एकत्र यावं यासाठी प्रयत्न करत असल्याची माहिती आहे. दोन्ही पवार सोबत यावेत यासाठी पडद्यामागे बऱ्याच घडामोडी सुरु आहेत. केंद्रातील मोदी सरकारमध्ये सुप्रिया सुळेंना मंत्रिपद मिळावं यासाठी शरद पवारांचे प्रयत्न सुरु असल्याच्या शक्यतेचा उल्लेख ‘फ्री प्रेस जर्नल’नं वृत्तात केलेला आहे.

दरम्यान निवडणूक आयोगाच्या निर्णयामुळे अजित पवार गटाला खरी राष्ट्रवादी म्हणून मान्यता मिळाली. त्यांच्याच पक्षाला राष्ट्रवादी काँग्रेसचं चिन्ह मिळालं. शरद पवार महायुतीत जाण्यास तयार असल्याचं वृत्त ‘रिपब्लिक’नं सुत्रांच्या हवाल्यानं दिलेलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शप भाजपच्या नेतृत्त्वाखालील महायुतीत गेल्यास तो राज्यात महाविकास आघाडीसाठी आणि देश पातळीवर इंडिया आघाडीसाठी मोठा धक्का आणि धोका असेल.

अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला विधानसभा निवडणुकीत चांगलं यश मिळालं. पक्षानं ४१ जागा जिंकल्या. तर शरद पवारांच्या पक्षाला केवळ १० जागांवर समाधान मानावं लागलं. केंद्रात आणि राज्यात सत्ता नसल्यानं पुढील राजकारण कसं करायचं, असा प्रश्न पवारांच्या आमदार, खासदारांना पडलेला आहे. त्यामुळेच सत्तेत जाण्याचे प्रयत्न सुरु झालेले आहेत.

दरम्यान  शरद पवारांच्या कन्या आणि राष्ट्रवादी काँग्रेस शपच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी काही दिवसांपूर्वीच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं कौतुक केलं आहे. ‘महायुतीमधील अनेक मंत्र्यांची अद्याप कार्यभार स्वीकारलेला नाही. केवळ एकच व्यक्ती अतिशय मेहनत घेतेय आणि ती व्यक्ती म्हणजे देवेंद्र फडणवीस. अन्य कोणी मेहनत घेताना दिसत नाही. देवेंद्रजी मिशन मोडवर काम करत आहेत. ही बाब कौतुकास्पद आहे,’ असे गौरवोउद्गार  सुळे ३ जानेवारीला पुण्यात काढले होते.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!