Maharashtra Cabinet Expansion Live : महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळाचा शपथविधी ….कुणाचा झाला समावेश ?

राष्ट्रगीताने सांगता ….
शपथविधी सोहळा समाप्त …
6. योगश कदम : शिवसेना , एकनाथ शिंदे
5. इंद्रनील नाईक : राष्ट्रवादी ,अजित पवार
4. मेघना बोर्डीकर : भाजप
3. पंकज भोयर : भाजप
2. आशिष जैस्वाल : शिवसेना , एकनाथ शिंदे
1. माधुरी मिसाळ : भाजप
राज्यमंत्री
33. प्रकाश आबिटकर : शिवसेना , एकनाथ शिंदे
32 . बाबासाहेब पाटील : राष्ट्रवादी ,अजित पवार
31. अशोक पुंडकर : भाजप
30. नितेश राणे : भाजप
29. मकरंद जाधव पाटील : राष्ट्रवादी ,अजित पवार
28. भारत गोगावले : शिवसेना , एकनाथ शिंदे
27. प्रताप सरनाईक : शिवसेना , एकनाथ शिंदे
26. संजय शिरसाट : शिवसेना , एकनाथ शिंदे
25. संजय सावकारे : भाजपा
24. नरहरी झिरवाळ : राष्ट्रवादी ,अजित पवार
23. जयकुमार गोरे : भाजपा
22. माणिकराव कोकाटे : भाजप
21. शिवेन्द्रसिंह भोसले : भाजप
20. अदिती तटकरे : भाजप
19. दत्तात्रय भरणे : राष्ट्रवादी ,अजित पवार
18. आशिष शेलार : भाजप
17. शंभूराज देसाई : शिवसेना , एकनाथ शिंदे
16. अशोक उईके : भाजप
15. अतुल सावे : भाजप
14. पंकजा मुंडे : भाजप
13. जयकुमार रावल : भाजप
12. उदय सामंत : शिवसेना , एकनाथ शिंदे
11. मंगलप्रभात लोढा : भाजप
10. धनंजय मुंडे : राष्ट्रवादी . अजित पवार
9. संजय राठोड : शिवसेना , एकनाथ शिंदे
8. दादा भुसे : शिवसेना , एकनाथ शिंदे
7. गणेश नाईक : भाजप
6. गुलाबराव पाटील : शिवसेना , एकनाथ शिंदे
5. गिरीश महाजन : भाजप
4. चंद्रकांत पाटील : भाजप
3. हसीन मुश्रीफ : राष्ट्रवादी , अजित पवार
2. राधाकृष्ण विखे पाटील : भाजप
1. चंद्रशेखर बावनकुळे : भाजप
शपथविधी सुरु …
महाराष्ट्र गीत सुरु ….
राष्ट्रगीत सुरु ….
राज्यपालांचे मंचावर आगमन
मुख्यमंत्री आणि दोन्हीही उपमुख्यमंत्री यांचे मंचावर आगमन
नितीन गडकरी उपस्थित
संभाव्य मंत्र्यांचे मंचावर आगमन
केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले नाराज : देवेंद्र फडणवीस यांनी मंत्रिपदाचे आश्वासन दिले होते पण पाळले नाही : रामदास आठवले
नागपूर : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकारचा आज रविवारी नागपूरमध्ये मंत्रिमंडळाचा पहिला विस्तार होत आहे. प्रशासनाने नागपूरच्या राजभवनमध्ये शपथविधीची तयारी केली आहे. असून थोड्याच वेळात राज्यपालांचे आगमन होत आहे…
सत्ता जनतेची सेवा करण्यासाठी….
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे विमानतळ ते लक्ष्मीभवन चौक या मार्गावरील विविध चौकांत ढोल ताशांच्या निनादात आणि पुष्पवृष्टी करत नागरिकांनी स्वागत केले. ‘देवा भाऊ आगे बढो, भारतीय जनता पक्षाचा विजय असो’, अशा घोषणांनी विमानतळ परिसर दुमदुमन गेला होता. हॉटेल रेडिसनसमोर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी देवेंद्र फडणवीस यांचे स्वागत करत त्यांना शुभेच्छा दिल्या.
लाडक्या बहिणी, भाऊ आणि नागरिकांनी आमच्यावर दाखवलेल्या विश्वासामुळे महायुतीला विजय मिळाला. आम्ही पूर्वी जमिनीवर होतो आणि सत्ता आल्यावर आता जमिनीवर राहून राज्याचा विकास करणार आणि महाराष्ट्र पहिल्या क्रमांकावर नेणार आहे. जनतेचे आशीर्वाद माझ्या पाठिशी आहे, त्यामुळे जनतेचे स्वप्न पूर्ण करणार असल्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.
जनतेची स्वप्न पूर्ण करणार…
विधानसभा निवडणुकीत विजय मिळाल्यानंतर राज्यात आपली सत्ता आली असून महाराष्ट्रात परिवर्तन केले जाणार आहे. माझी जन्म आणि कर्मभूमी असलेल्या नागपूरच्या जनतेने माझ्यावर भरभरुन प्रेम केले आणि आशीर्वाद दिले आहे. सत्ता मिळाली आहे ती जनतेची सेवा करण्यासाठी, आम्ही जमिनीवर राहूनच काम करणार आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार आणि आमची सर्व टीम दिवस रात्र चौवीस बाय सात काम करुन महाराष्ट्राचा विकास करेल आणि जनतेची स्वप्न पूर्ण करणार आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रथम नगरागमनानिमित्त भाजपने त्यांच्या स्वागतासाठी शहरात जंगी तयारी केली होती. ठिकठिकाणी मोठे होर्डिंग लावण्यात आले होते. राज्याच्या सर्वोच्च पदाची तिसऱ्यांदा सूत्रे स्वीकारल्यानंतर रविवारी दुपारी १२ वाजता त्यांचे नागपूर विमानतळावर आगमन झाल्यावर भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी त्यांचे स्वागत केले.
यावेळी विमानतळ परिसरात कार्यकर्त्यांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. त्यांना लाडक्या बहिणीने औक्षवण केले. देवा भाऊंचा विजय असो… अशा घोषणांनी परिसर दुमदुमन गेला. त्यांच्या स्वागतासाठी पक्षाचे कार्यकर्तेच नाही तर, मोठ्या प्रमाणात मिरवणुकीच्या मार्गावर लाडक्या बहिणी आणि सर्वसामान्य देखील उपस्थित होते.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे १२ वाजता आगमन झाल्यानंतर त्यांनी विमानतळ परिसरातील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन केले. त्यानंतर विमानतळ चौकातील हेडगेवार स्मारकस्थळी वंदन केले. त्यानंतर हॉटेल प्राइंड येथून मिरवणुकीला प्रारंभ झाला. देवेंद्र फडणवीस यांच्या सोबत पत्नी अमृता फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, आमदार कृष्णा खोपडे आदी खुल्या जीपवर होते. यावेळी सोमलवाडा चौक, राजीव नगर चौक, रेडिसन ब्ल्यू हॉटेल चौक, छत्रपती चौक येथून डावीकडे खामला चौक येथून उजवीकडे तात्या टोपे चौक, आठ रस्ता चौक, लक्ष्मीनगर चौक, बजाजनगर चौक, शंकरनगर चौक मार्गाने लक्ष्मीभवन चौक याठिकाणी देवेंद्र फडणवीस यांचे पुष्पवृष्टी करत स्वागत करण्यात आले. लक्ष्मीभवन चौकात विविध लोकनृत्य आणि लेझीम पथकाने कवायती सादर करत त्यांचे स्वागत केले. लक्ष्मीभवन चौकात मिरवणुकीचा समारोप झाला.
अजित पवार काय म्हणाले?
“स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसंदर्भात न्यायालयातील निकाल केव्हाही येऊ शकतो. तीन वर्षांपासून सर्व जिल्ह्यातील निवडणुका झालेल्या नाहीत. २०२२ मध्येच या निवडणुका व्हायला पाहिजे होत्या. मात्र, तीन वर्ष स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीपासून कार्यकर्ते वंचित राहिले. आता मंत्रिमंडळाचा विस्तार झाल्यानंतर सुनील तटकरे, चंद्रशेखर बावनकुळे आणि एकनाथ शिंदे जो एक प्रतिनिधी देतील तो हे सर्व मित्रपक्षाबरोबर चर्चा करतील आणि जी महामंडळे आहेत त्याच्या नेमणुका पुढील तीन महिन्यांत करण्याचं आम्ही ठरवलंय. महामंडळाच्या वाटपावरून पाच वर्ष तुम्हाला आम्ही ताटकळत ठेवणार नाहीत”, असंही अजित पवार म्हणाले.
अडीच-अडीच वर्षांचा फॉर्म्युला?
“आज मंत्रिमंडळात विस्तार होत असताना सर्वांनाच वाटतं की आपल्याला संधी मिळावी. आता सर्वजण ताकदीचे नेते असतात. मात्र, जागा मर्यादित असतात. मागच्या वेळी आपण जेव्हा सरकारमध्ये गेलो, तेव्हा काहींना मंत्रिपदाचा दीड वर्षांचा काळ मिळाला. मात्र, आता या पाच वर्षांच्या कार्यकाळासाठी आम्ही असं ठरवलं आहे की काहींना अडीच-अडीच वर्षांसाठी संधी द्यायची. मग त्यामध्ये अनेक मंत्री आणि राज्यमंत्री सामावून घेतले जातील. यामुळे अनेक जिल्ह्यांना प्रतिनिधित्व मिळेल. अनेक भागांना यातून प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळेल, यावर आमचं महायुतीच्या तिन्ही नेत्यांमध्ये एकमत झालेलं आहे”, असं अजित पवारांनी म्हटलं आहे.