Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

परभणी आंदोलन : आंदोलकांना शांतता राखण्याचे प्रकाश आंबेडकर यांचे आवाहान आणि सरकारला इशारा ….

Spread the love

मुंबई : संविधान अवमानना प्रकरणाच्या निषेधार्थ पुकारण्यात आलेल्या परभणी बंदला हिंसक वळण लागले. त्यामुळे पोलिसांना आश्रुधुराचे नळकांडे फोडून बळाचा वापर करावा लागला. शिवाय अग्नीशामकच्या वाहनातून आंदोलकांवर पाण्याचा फवारा मारून त्यांना पंगविण्यात आले. ठिकठिकाणी रस्त्यावर पेटविलेल्या टायरची आगही अग्निशमन दलाने विझविली. यानंतर आता वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी आंदोलकांना शांत राहण्याचे आवाहन केले असून, दुसरीकडे महायुती सरकारला इशाराही दिला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, जिंतूर मार्ग, पाथरी मार्ग वसमत रोडवर विविध ठिकाणी आंदोलकांनी ठिय्या मांडला होता. तसेच टायरही जाळून वाहतूक रोखण्यात आली होती. अचानक आंदोलन चिघळले. आंदोलकांनी स्टेशन रोड परिसरात दुकानाचे शटर, फलक, दुचाकी, चारचाकी वाहनांवर दगडफेक सुरू केली. रस्त्यावर फलक आणून ते जाळण्यात आले. एक वाहन तोडफोड करून जाळल्यानंतर आंदोलन चिघळण्याची चिन्हे दिसताच पोलिस कुमक वाढविली. त्यांनी बळाचा वापर गर्दीवर नियंत्रण मिळवून ती पांगविण्याचा प्रयत्न केला. प्रकाश आंबेडकर यांनी एक्सवर पोस्ट शेअर करत या घटनेबाबत प्रतिक्रिया नोंदवली आहे.

…तर त्याचे परिणाम भोगावे लागतील”

परभणीत जातीयवादी मराठा समाजकंटकांनी बाबासाहेबांच्या पुतळ्याची केलेली भारतीय राज्यघटनेची तोडफोड ही अत्यंत लाजिरवाणी गोष्ट आहे. बाबासाहेबांच्या पुतळ्याची किंवा दलित अस्मितेच्या प्रतिकाची अशी तोडफोड होण्याची ही पहिलीच घटना नाही. वंचित बहुजन आघाडीचे परभणी जिल्हा कार्यकर्ते प्रथम घटनास्थळी होते आणि त्यांच्या निषेधामुळे पोलिसांनी एफआयआर दाखल केला आणि एकाला अटक केली. कायदा व सुव्यवस्था राखण्याची विनंती सर्वांना करतो. जर येत्या २४ तासांत सर्व हल्लेखोरांना अटक केली नाही तर त्याचे परिणाम भोगावे लागतील, असा इशारा प्रकाश आंबेडकर यांनी दिला.

दरम्यान, येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यानजीकचा जमाव मात्र तसाच होता. स्टेशन रोडवर दगडफेक सुरूच होती. त्यानंतर हा जमाव पोलिसांच्या वाहनांवर चालून गेला. पोलिस अधीक्षक कार्यालयाच्या परिसरात पोलिस वाहनांवर दगडफेक झाली. पोलिसांवर लाठ्यांनी हल्लाही झाला. त्यानंतर पोलिसांनी पुन्हा वाढीव कुमक मागवून शहरातील विविध भागात आंदोलकांना पिटाळून लावले. यात काही ठिकाणी आश्रुधुराचाही वापर झाला. आंदोलकांनी दगडफेक केल्याने पोलिसांनी बळाचा वापर केल्याने पुन्हा तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. वसमत रोड भागातही पोलीस आणि आंदोलकांमध्ये चकमक झाली.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!