MaharashtraPolticalUpdate : मतदारांनी इतिहास घडविला , पहिल्यांदाच विराेधी पक्षनेत्याविना चालणार सभागृह?

मुंबई : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या निवडणुकीत विरोधी आघाडीचा दारुण पराभव करीत मतदारांनी राज्यात असा इतिहास घडविला आहे की , यावेळी पहिल्यांदाच विरोधी पक्षविना सभागृह चालणार आहे . या पसाठी विधानसभेच्या एकूण जागांपैकी १० टक्के जागा एखाद्या पक्षाला मिळाल्यास त्यांना विरोधी पक्ष नेतेपद देण्याचा नियम आहे.
दरम्यान या निवडणुकीत विरोधी महाविकास आघाडीतील घटक पक्ष काँग्रेस, शिवसेना (उबाठा) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) यापैकी काेणत्याही पक्षाला 20 पेक्षा जास्त जागा निवडून आणता आलेल्या नाहीत. विराेधी पक्षनेतेपदासाठी लाेकसभा तसंच विधानसभेत एकूण सदस्य संख्येच्या प्रमाणात ठराविक संख्याबळाची आवश्यकता असते. त्यामुळं लाेकसभा आणि विधानसभा नियमावलीनुसार एखाद्या पक्षाला विराेधी पक्षनेतेपद तेव्हाच मिळतं, जेव्हा राज्यातील विधानसभेच्या एकूण जागांपैकी 10 टक्के जागा असतात. सध्या महाविकास आघाडीतील घटक पक्षांपैकी काेणत्याही पक्षाला किमान दहा टक्के जागांची मर्यादादेखील ओलांडता आली नाही. महाविकास आघाडीसाठी विराेधी पक्षनेते पदाचा मार्ग देखील बंद झालाय.
महाविकास आघाडीला केवळ 46 जागा- महाराष्ट्र विधानसभेत एकूण 288 जागा आहेत. त्यामुळं काेणत्याही पक्षाकडं विराेधी पक्षनेतेपदासाठी किमान 29 आमदार असले पाहिजेत. पण, महाविकास आघाडीत काेणत्याही पक्षाचे 29 आमदार विजयी झालेले नाहीत. काँग्रेसपासून शिवसेना (उबाठा) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पर्यंत काेणत्याही पक्षाला 20 पेक्षा जास्त जागा जिंकता आल्या नाहीत. महाविकास आघाडीच्या तिन्ही प्रमुख पक्षांच्या आणि अन्य लहान घटक पक्षांच्या मिळून 46 जागा मिळाल्या. पण एकाही पक्षाला 29 जागा मिळाल्या नाहीत. त्यामुळं महाराष्ट्रात महाविकास आघाडीला विराेधी पक्षनेता
काेणाला किती जागा?
विधानसभेच्या 288 जागांपैकी महायुतीला 230 जागा मिळाल्या आहेत. यात भाजपाला 132 जागा, शिवसेनेला 57 आणि राष्ट्रवादी काँग्रेसला 41 जागा मिळाल्या आहेत. महाविकास आघाडीला एकूण 46 जागा मिळाल्या आहेत. काँग्रेसला 16, शिवसेनेला (उबाठा) 20 आणि राष्ट्रवादी काँग्रेसला (शरदचंद्र पवार) 10 जागा जिंकता आल्या आहेत. तर अपक्ष-इतर यांना 12 जागा मिळाल्या आहेत.