Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

विनाेद तावडेंकडे पैसे सापडले, उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया

Spread the love

विरार : विरारमध्ये पैसे वाटपाच्या आराेपावरुन भाजप आणि बहुजन विकास आघाडीमध्ये तुान राडा झाल्याचा व्हिडीओ समाेर आला आहे. भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनाेद तावडे यांनी एका हाॅटेलात पैसे वाटल्याचा आराेप बहुजन विकास आघाडी पक्षाने केला आहे .या घटनेनंतर बविआ कार्यकर्ते आणि भाजपमध्ये चांगलीच जुपली आहे .तर विनाेद तावडेंनी या सर्व आराेपांचे खंडन केले आहे. दरम्यान या घडलेल्या प्रकारानंतर उद्धव ठाकरेंनी तोफ डागली आहे. भ्रष्ट राजवट खतम करून टाकावी, असं साकडच उद्धव ठाकरेंनी तुळजाभवानीला घातलं आहे. उद्धव ठाकरे तुळजापुरला सहकुटुंब दर्शनासाठी गेले आहे. त्यावेळी ते बाेलत हाेते.

या सर्व प्रकरणानंतर शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे संध्याकाळी 5 वाजता माताेश्रीवर पत्रकार परीषद घेणार आहेत.उद्धव ठाकरे म्हणाले, तुळजाभवानी दर्शनासाठी येताना माझी बॅग तपासण्यात आली, मात्र काही सापडले नाही. विनाेद तावडे यांच्या बॅगेत पैसे सापडले. अनिल देशमुख यांच्यावर दगड पडले त्याचा तपास काेण करणार? भ्रष्ट आणि दहशतवादी राजवटीचा अंत हाेऊ दे असं साकडे घातले.

भाजप नेते प्रवीण दरेकर म्हणाले, विनाेद तावडे राष्ट्रीय सरचिटणीस आहेत. ते एका विधानसभेत जाऊन पैसे वाटत आहेत हा आराेप हास्यास्पद आह. मविआच्या हातातून निवडणूक गेली हे त्यांच्या लक्षात आलंय. मविआने परसेप्शन सेट करण्याचा प्रयत्न केला पण अपयशी ठरला. कल्याणकारी याेजनांमुळे वातावरण चांगलं आहे. नालासाेपारा येथे झालेला प्रकार हतबलतेने आणि पराभवाच्या भीतीतून झाला आहे.

विनाेद तावडे हे विरारमधील एका हाॅटेलमध्ये 5 काेटी रुपये घेऊन आले हाेते. ही गाेष्ट बविआच्या कार्यकर्त्यांना समजली तेव्हा त्यांनी हाॅटेलवर धाव घेतली. यानंतर हाॅटेलमध्ये बविआ आणि भाजप कार्यकर्त्यांमध्य राडा झाल्याची माहिती समाेर आली आहे. या घटनेनंतर विनाेद तावडे गेल्या अडीच तासांपासून हाॅटेलमध्ये अडकून पडले आहेत. बविआच्या कार्यकर्त्यांनी याठिकाणी ठिय्या देत तावडेंची वाट राेखून धरली आहे. या घटनेनंतर पाेलीस आता काय कारवाई करतात, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!