Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

MaharshtraVidhansabhaNewsUpdate : राज्यभरात 983 उमेदवारांची माघार , २८८ मतदार संघात 8272 उमेदवार मैदानात …

Advertisements
Advertisements
Spread the love

मुंबई : महाविकास आघाडी असो की महायुती दोन्हींकडेही बंडखोर उमेदवारांनी आपापल्या पक्षांसमोर मोठे आव्हान उभे केले होते परंतु अनेक महत्वपूर्ण लढती असलेल्या मतदार संघात बंडखोरी करणाऱ्या उमेदवारांचे मन वळविण्यात सर्वच पक्षांना यश मिळाले .परंतु आज दिवस गाजला तो कोल्हापूर उत्तर आणि माहीम च्या उमेदवारांनी. यात कोल्हापूरमध्ये काँग्रेसच्या उमेदवार मधुरिमा राजे छत्रपती यांनी आपला उमेदवारी अर्ज परत घेतल्यामुळे काँग्रेस नेते सतेज पाटील चांगलेच संतापले तर माहीममधील शिवसेना उमेदवार सदा सरवणकर हे राज ठाकरेंच्या भेटीसाठी शिवतीर्थ बंगल्यावर गेले होते. मात्र, सदा सरवणकर यांना राज ठाकरेंनी भेट नाकारली. त्यानंतर, सरवणकर यांनी आपली उमेदवारी कायम ठेवली.

दरम्यान आज दिवसभरात 983 उमेदवारांनी अर्ज मागे घेतल्यामुळे राज्यातील 288 मतदारसंघात 8272 उमेदवार मैदानात उतरले आहेत. तर, निवडणूक आयोगाने 1654 उमेदवारांचे अर्ज फेटाळले आहेत. त्यामुळे, आज अंतिम लढती निश्चित झाल्या. आज ज्या बंडखोर उमेदवारांनी आपले अर्ज कायम ठेवले त्यात पुढील उमेदवारांचा समावेश आहे.

Advertisements

समीर भुजबळ, नांदगाव, राष्ट्रवादी अजित पवार
हीना गावित, अक्कलकुवा
गीता जैन, मीरा रोड
ज्योती मेटे, बीड
गायत्री शिंगणे, सिंदखेड राजा
राजश्री आहेर, देवळाली (शिवसेना)

Advertisements
Advertisements

पक्षातील आणि मित्र पक्षातील बंडखोरांमुळे महायुती आणि महाविकास आघाडी दोन्हीकडे डोकेदुखी वाढली आहे. मविआतील अशा बंडखोरांना आदित्य ठाकरेंनी सज्जड दम दिलाय तर फडणवीसांनी बंडखोर अधिकृत उमेदवारामागे उभे राहतील असा आशावाद व्यक्त केला आहे. दरम्यान ज्या बंडखोर उमेदवारांनी आपले अर्ज आज परत घेतले त्यामध्ये पुढील बंडखोर उमेदवारांचा समावेश आहे.

बोरिवली – गोपाळ शेट्टी
पिंपरी चिंचवड – नाना काटे
अणुशक्तीनगर- सना मलिक- अविनाश राणे (शिवसेना)
दिंडोरी- नरहरी झिरवाल- धनराज महाले (शिवसेना)
उदगीर- संजय बनसोडे- दिलीप गायकवाड ( भाजप)

या मतदारसंघात मैत्रिपूर्ण लढत होणार

दीपक आबा साळुंखे, शिवसेना ठाकरे, डॉ. बाबासाहेब देशमुख, शेकाप विरुद्ध महायुतीकडून शहाजी बापू पाटील

रायगड अलिबाग – चित्रलेखा पाटील (शेकाप), राजा ठाकूर (काँग्रेस), सुरेंद्र म्हात्रे उबाठा शिवसेनेत होणार मैत्रीपूर्ण लढत

पुरंदर – अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे संभाजी झेंडे आणि शिंदेंच्या शिवसेनेचे विजय शिवतारे यांची उमेदवारी कायम.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!