मोठी बातमी : मनोज जरांगे पाटील आज आपले पत्ते उघडणार , अवघ्या महाराष्ट्राचे लक्ष आंतरवाली सराटीकडे….

जालना : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनोज जरांगे पाटील यांची भेट घेण्यासाठी महाराष्ट्रातले अनेक नेते आंतरवाली सराटीत दाखल होत आहेत. आज सायंकाळपर्यंत आपले बहुतेक उमेदवार जाहीर होतील असे पत्रकारांशी बोलताना सांगितले. विधानसभा उमेदवारांची नावे घोषित होण्याआधीच त्यांना भेटायला मोठ्याप्रमाणावर गर्दी जमत आहे. त्यांच्या राजकीय प्रभावामुळे, आणि ते निवडणुकीत कोणत्या पक्षाचे उमेदवार होतील याबाबत लोकांमध्ये मोठी उत्कंठा आहे. मनोज जरांगे पाटील आज उमेदवार आणि मतदारसंघाची घोषणा करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
आज आंतरवाली सराटीत झालेल्या पत्रकार परिषदेत त्यांच्यासमवेत आनंदराज आंबेडकर , राजरत्न आंबेडकर आणि मुस्लिम समाजाचे नेते उपस्थित होते. दरम्यान महाराष्ट्राच्या ग्रामीण भागातून आलेले अनेक समर्थक त्यांच्या घरी जाऊन त्यांच्या राजकीय भवितव्याविषयी विचारपूस करत आहेत.
पाटील यांच्यासोबत संवाद साधणार्या लोकांमध्ये स्थानिक निवडणुका कशा जिंकता येतील, कोणते मुद्दे चर्चेत आणले पाहिजेत आणि जनसमर्थन कसे मिळवता येईल याबाबत विचारमंथन करत आहेत. हा गर्दीचा प्रमाण असल्याने, नवीन उमेदवार आणि पक्षीय धोरणांबद्दल अंदाज व्यक्त केले जात आहेत. नावांचे अधिकृत घोषणेच्या आधीच पाटील यांच्या ईच्छा आणि उद्दिष्टांबद्दल चर्चा होणार असल्याचे दिसत आहे. अशा प्रकारे राजकीय रंगमंचावर पाटील यांच्या भूमिकेची प्रतीक्षा आहेत.
कोल्हापूर विधानसभेचे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे उमेदवार आणि मंत्री हसन मुश्रीफसुद्धा मनोज जरांगे पाटील यांची भेट घेण्यासाठी आंतरवाली सराटीमध्ये दाखल झाले आहेत. परवाच मुश्रीफ यांचे विरोधक आणि शरद पवार गटाचे उमेदवार समरजीत घाटगे हे देखील मनोज जरांगे पाटील यांच्या भेटीसाठी अंतरवाली सराटीत दाखल झाले होते. अशातच आज मुश्रीफ अंतरवाली सराटीत आले आहेत.
मनोज जरांगे रात्रीपर्यंत निर्णय सांगणार
मनोज जरांगे पाटील यांनी महाराष्ट्रातल्या सर्व जनतेला दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या. महाराष्ट्रात ज्यांनी आमच्या वतीने उमेदवारी अर्ज दाखल केले त्यांनी तातडीने एकत्र बसून बैठक घ्या. सर्वांनी मिळून एक उमेदवार ठरवा. चांगली संधी आलेली आहे. ओढातानीच्या नादात ही संधी घालू नका.
मराठ्यांचा आत्मविश्वास प्रचंड वाढला आहे. मराठा, दलित, मुस्लिम हे समीकरण एकत्र आलं आहे. आम्हाला तीन तारखेला मतदार संघ आणि उमेदवार जाहीर करायचे आहे. त्यामुळे आज किंवा उद्या एकत्र बसून एकच उमेदवार जाहीर करा, असं मनोज जरांगे यांनी आज म्हटलं होतं. त्याप्रमाणे मनोज जरांगे पाटील आज त्यांची भूमिका जाहीर करणार आहेत.
मनोज जरांगे पाटील आणि हसन मुश्रीफ या दोघांमध्ये अंतरवाली सराटीत चर्चा झाली आहे. हसन मुश्रीफ यांनी कागल विधानसभा मतदारसंघात मनोज जरांगे यांच्याकडे समर्थन मागितले आहे. याबाबत मनोज जरांगे रात्रीपर्यंत सांगणार असल्याची माहिती मुश्रीफ यांनी भेटीनंतर दिली आहे.