Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

VBANewsUpdate : प्रकाश आंबेडकर यांची प्रकृती स्थिर : सुजात आंबेडकर

Spread the love

पुणे : छातीत दुखत असल्याच्या कारणाने रुग्णालयात दाखल करण्यात आलेले वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांच्या प्रकृतीबाबत हेल्थ अपडेट समोर आली आहे. प्रकाश आंबेडकर यांची प्रकृती सध्या स्थिर असल्याची माहिती वंचित बहुजन आघाडीचे नेते आणि प्रकाश आंबेडकरांचे सुपुत्र सुजात आंबेडकर यांनी दिली. रुग्णालयात गर्दी न करण्याचे आवाहनही त्यांनी केले.

प्रकाश आंबेडकर यांना छातीत दुखू लागल्याने गुरुवारी पहाटे (31 ऑक्टोबर) पुण्यातील रुग्णालयात दाखल करण्यात आले. प्रकाश आंबेडकर यांच्या हृदयात रक्ताची गुठळी झाल्यामुळे त्यांच्यावर आयसीयूमध्ये उपचार सुरू आहेत. प्रकाश आंबेडकर यांना रुग्णालयात अचानकपणे दाखल करण्यात आल्याने वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांसह इतर सामाजिक राजकीय कार्यकर्त्यांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले. सुजात आंबेडकर यांनी रुग्णालयाबाहेरून माध्यमांशी संवाद साधताना म्हटले की, प्रकाश आंबेडकरांची प्रकृती आता स्थिर आहे. त्यांच्यावर अँजिओग्राफी पार पडणार आहे. डॉक्टरांचे एक पथक त्यांची वैद्यकीय तपासणी करत आहे. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार सर्व वैद्यकीय उपचार सुरू आहेत, असे सुजात यांनी सांगितले.

काल रात्री छातीत दुखल्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं, असेही सुजात यांनी म्हटले. सर्व कार्यकर्त्यांना विनंती आहे की त्यांची प्रकृती स्थिर आहे आम्ही सगळे काळजी घेत आहोत कुणीही गर्दी करू नका असे आवाहनही सुजात यांनी केले. कुटुंबाच्या गोपनीयतेच्या विनंतीचा आदर करावा असे आवाहनही आंबेडकर कुटुंबाच्यावतीने करण्यात आले आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!