”चला शिवस्मारक शोधायला” : छत्रपती संभाजीराजे यांचे अरबी समुद्रात बोटीतून आक्रमक आंदोलन

मुंबई : छत्रपती संभाजीराजे यांनी ”चला शिवस्मारक शोधायला” हे आंदोलन केले आहे. या अंतर्गत अरबी समुद्रामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते शिवस्मारकाचे भूमिपूजन करण्यात आले होते. मात्र, अद्याप हे शिवस्मारक उभारण्यात आलेले नाही. यावरुन आक्रमक भूमिका घेत ”चला शिवस्मारक शोधायला” आंदोलन सुरु केले आहे. यासाठी छत्रपती संभाजीराजे हे मुंबईला गेट वे परिसरात आंदोलन करत आहेत.
२४ डिसेंबर २०१६ मध्ये तब्बल 8 वर्षांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते अरबी समुद्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या शिवस्मारकाचे भूमिपूजन करण्यात आले होते. मात्र या स्मारकाचे अद्याप कोणत्याही प्रकारचे काम सुरु करण्यात आलेले नाही. याविरोधात छत्रपती संभाजीराजे यांनी आंदोलनाचे शस्त्र उपसले आहे. याच पार्श्वभूमीवर ”चला शिवस्मारक शोधायला” हे आंदोलन आज संभाजीराजे यांच्याकडून करण्यात येत आहे. संभाजीराजे पुण्यातून मुंबईला गेले असून तिथे गेट वे परिसरात आंदोलन करत आहेत. यावेळी अरबी समुद्रामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते भूमिपूजन झालेल्या ठिकाणी ते पाहणी करणार आहेत. अरबी समुद्रामध्ये शिवाजी महाराजांचा स्मारक उभारले जाणार होते त्याचा उपयोग फक्त राजकारणासाठीच असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे.
या आंदोलनाबाबत बोलताना छत्रपती संभाजीराजे म्हणाले की, ”मुंबईच्या अरबी समुद्रात जगातील सर्वात उंच असे जागतिक दर्जाचे भव्य शिवस्मारक साकारू, अशी स्वप्ने शिवप्रेमी जनतेला दाखवत मागील तीन दशकांत राज्यात अनेक सरकारे आली आणि गेली. २४ डिसेंबर २०१६ रोजी भाजप-शिवसेना प्रणित महायुती सरकारने अत्यंत भव्यदिव्य कार्यक्रमाचे आयोजन करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते अरबी समुद्रात शिवस्मारकाचे जलपूजन केले. स्मारकाच्या कामास सुरुवात झाल्याच्या अनेक बातम्या आल्या. शासनाच्या रेकॉर्डवर या स्मारकासाठी कोट्यवधी रुपये खर्च देखील झाले आहेत. येत्या काही दिवसांत या जलपूजन कार्यक्रमास आठ वर्षे पूर्ण होतील, मात्र अरबी समुद्रातील हे शिवस्मारक अद्यापही कुठे दिसत नाही. चला तर मग, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जलपूजन केलेले अरबी समुद्रातील शिवस्मारक शोधूया”, अशा शब्दांत छत्रपती संभाजीराजे यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे.
https://www.facebook.com/photo.php?fbid=1063876905109463&set=a.527880982042394&type=3&ref=embed_post