Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

शिवरायांचा राज्याभिषेक या लोकांनी होऊ दिला नाही, त्यांची नियत चांगली नाही म्हणूनच पुतळा पडला : राहुल गांधी

Spread the love

कोल्हापूर : शिवाजी महाराजांच्या विचारांचं प्रतिबिंब आज आपल्याला संविधानात दिसून येत आहे. त्यांच्या विचारांचा आणि संविधानाचा थेट संबंध आहे. संविधानात अशी एकही तरतूद नाही, जी शिवाजी महाराजांच्या विचारातून आलेली नाही. त्यांच्या विचारातून संविधानाची निर्मिती झाली आहे. मात्र, भाजपाकडून याच संविधानसा संपवण्याचा प्रयत्न सुरू आहे, शिवाय त्यांची नियत नीट नव्हती म्हणून त्यांच्या हातून अनावारण  झालेला पुतळा पडला . छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाला याच विचारधारेने विरोध केला होता  अशी घणाघाती टीका राहुल गांधी यांनी केली आहे. कोल्हपूरमध्ये आज राहुल गांधी यांच्या हस्ते शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं अनावरण करण्यात आले. यावेळी बोलताना त्यांनी भाजपाला चांगलेच लक्ष्य केले.

यावेळी बोलताना राहुल गांधी म्हणाले की , “आज आपण छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे अनावरण करण्यासाठी इथे जमलो आहोत. हा केवळ एक पुतळा नाही. तर एक विचार आहे. पुतळा तेव्हाच बनवला जातो, जेव्हा आपण त्या व्यक्तीच्या विचारांचा आदर करतो. छत्रपती शिवाजी महाराज आयुष्यभर ज्या विचारांसाठी लढले, तोच विचार आपण पुढे घेऊन जाणार नसू तर आज या पुतळ्याच्या अनावरणाचा काहीही अर्थ राहणार नाही”, अशी प्रतिक्रिया राहुल गांधी यांनी दिली.

याच विचारधारेच्या विरोधात काँग्रेस पक्षही लढतो आहे….

पुढे बोलताना ते म्हणाले, “ज्यावेळी शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक होणार होता, तेव्हा भाजपाच्या विचारधारेच्या लोकांनी त्यांचा राज्याभिषेक होऊ नये, यासाठी प्रयत्न केले होते. त्यामुळे आज सुरु असलेली विचारधारेची लढाई ही खूप जुनी आहे. या विचारधारेविरोधात शिवाजी महाराजदेखील लढले होते आणि आता याच विचारधारेच्या विरोधात काँग्रेस पक्षही लढतो आहे. ज्याप्रकारे या लोकांनी शिवाजी महाराजांच्या राज्यभिषेकाला विरोध केला, त्याप्रमाणे आताच्या सत्ताधाऱ्यांनी संसदेच्या उद्घाटनाला आदिवासी राष्ट्रपती असलेल्या द्रौपदी मुर्मू यांना बोलवले  नाही”, असेही त्यांनी नमूद केले.

https://x.com/ANI/status/1842454064950546827?

आपल्या भाषणात भाजपवर  हल्ला करताना ते म्हाणाले की ,  “भाजपाचे लोक सकाळी उठतात आणि शिवाजी महाराजांच्या विचारांचे  संविधान कसे संपवायचे  यासाठी प्रयत्न करतात. भाजपाचे लोक भारतातील विविध संस्थांवर आक्रमण करतात. लोकांना घाबरवतात आणि इतकं करूनही परत शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर नतमस्तक होतात. याला काहीही अर्थ नाही. जर तुम्ही शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर तर नतमस्तक होत असाल, तर तुम्हाला संविधानाचे रक्षण करावंच लागेल.

…..कारण सरकारची नियत खराब होती !!

दरम्यान, शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळण्याच्या घटनेवरूनही राहुल गांधी यांनी भाजपावर शाब्दिक हल्ला चढवला. “भाजपाने राजकोट किल्ल्यावर शिवाजी महाराजांचा पुतळा बसवला. मात्र, काही दिवसांतच तो पुतळा कोसळला, कारण सरकारची नियत खराब होती. शिवाजी महाराजांचा पुतळा उभारणार असाल, तर त्यांच्या विचारांचे संरक्षण करावंच लागेल, असा संदेश महाराजांच्या पुतळ्याने दिला. मात्र, भाजपाचे लोक महाराजांच्या पुतळ्यासमोर जाऊन हात जोडतात. मात्र, त्यांचेच विचार पायदळी तुडवण्याचं काम करतात”, असेही ते म्हणाले.

सामान्य कुटुंबाच्या घरी स्वत: तयार केले जेवण….

दरम्यान, आपल्या दौऱ्यात विमानतळावर उतरून ते थेट एका सामान्य कुटुंबाच्या घरी गेले. तिथे जाऊन त्यांनी स्वतः स्वयंपाक करून त्या कुटुंबाला जेवूही घातलं. या भेटीवरून प्रतिक्रिया देताना या अजयकुमार सनदे  यांनी म्हटले आहे की , राहुल गांधी आमच्याकडे येणार आहेत, याची आम्हाला कल्पना नव्हती. पण सामान्य कुटुंब निवडून ते माझ्या घरी आले. माझ्या घरी येऊन अर्धा तास आले. मला अतिआनंद आहे. त्यांचे पाय आमच्या घराला लागले, यातच आम्हाला सार्थकी लागल्यासारखं वाटतंय.

अजयकुमार सनदे यांच्या पत्नी म्हणाल्या, राहुल गांधी आमच्या घरी आले हे आमचं भाग्यच आहे. त्यांनी भाकरी, हरभऱ्याची भाजी, वांग्याची भाजी आणि कांद्याची पात बनवली. भावासारखं त्यांनी केलं. त्यांच्या हातचं आम्हाला खायला मिळालं हे आमचं भाग्य आहे. तर, अजयकुमार सनदे यांच्या मुलाने सांगितलं की, ते आमच्या घरी आलेत याचा आम्हाला अभिमान आहे. ते स्वतःहून आमच्याकडे आले होते. तसंच, यावेळी त्यांनी येथील उपस्थित तरुणींशीही संवाद साधला. त्यांच्या समस्या जाणून घेतल्या.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!