Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

KolkataRapeAndMurderCase : कोलकाता येथील खून झालेल्या महिला डॉक्टरवर सामूहिक बलात्कार झाला काय ? सीबीआय ने दिले उत्तर ..

Advertisements
Advertisements
Spread the love

नवी दिल्ली : कोलकाता येथील आर. जी. कर महाविद्यालयात ट्रेनी डॉक्टर म्हणून काम करणाऱ्या महिला डॉक्टरवर ९ ऑगस्टला बलात्कार झाला. त्यानंतर अत्यंत क्रूरपणे तिची हत्या करण्यात आली. कोलकाता पोलिसांकडे असलेल्या या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे वर्ग करण्यात आला. दरम्यान सीबीआय ने म्हटले आहे आरोपी संजय रॉय ने बलात्कार करून तिची हत्या केल्याची कबुली दिली आहे . मात्र पीडितेवर सामूहिक बलात्कार झाला नसल्याचे सीबीआय च्या सूत्रांनी म्हटले आहे.

९ ऑगस्टला सकाळी एक महिला डॉक्टर आर. जी. कर वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयातल्या सेमिनार हॉलमध्ये मृतावस्थेत आढळली. तिचा मृतदेह अर्धनग्न अवस्थेत होता. तिच्या मृतदेहाचं शवविच्छेदन करण्यात आलं तेव्हा तिच्यावर बलात्कार झाला असल्याची बाब समोर आली. तिच्या शरीरावर आणि गुप्तांगावर अनेक जखमा होत्या. तिच्या डोळ्यांमधूनही रक्त वाहात होतं अशीही माहिती समोर आली. त्यानंतर देशभरात संतापाची लाट उसळली आहे. या मुलीला न्याय दिला पाहिजे अशी मागणी होते आहे. अत्यंत क्रूर पद्धतीने तिची हत्या करण्यात आली. त्याआधी तिच्यावर पाशवी बलात्कार करण्यात आला. या प्रकरणात आरोपी संजय रॉयला पोलिसांनी अटक केली आहे. या प्रकरणाचा तपास सीबीआयकडून केला जातो आहे. दरम्यान आता सीबीआयने डॉक्टरवर सामूहिक बलात्कार झाला का? या प्रश्नाचे उत्तर दिले आहे.

Advertisements

संजय रॉयला पोलिसांनी केली अटक

या प्रकरणात डॉक्टरांचे आंदोलनही झाले. दरम्यान संजय रॉयला पोलिसांनी अटक केली. संजय रॉय हा त्या दिवशी नशेत होता. तसेच त्याने पहाटे ३ च्या दरम्यान रुग्णालयात येऊन या डॉक्टर महिलेवर बलात्कार केला आणि त्यानंतर तिची हत्या केली. संजय रॉयने गुन्हा कबूल केला असून या अनुषंगाने सीबीआयने एका महत्त्वाच्या प्रश्नाचे उत्तर दिले आहे.

Advertisements
Advertisements

या प्रकरणात सीबीआयचा तपास सुरु असून सीबीआयने म्हटले आहे की , ३१ वर्षीय महिला डॉक्टरवर सामूहिक बलात्कार झाला नाही. संजय रॉय यानेच तिच्यावर बलात्कार केला आणि त्यानंतर तिची हत्या केली. सीबीआयच्या सूत्रांनी इंडिया टुडेला ही माहिती दिली आहे. संजय रॉय पहाटेच्या सुमारास रुग्णालयात आला त्यानंतर त्याने सेमिनार हॉलमध्ये झोपलेल्या डॉक्टर महिलेवर बलात्कार सीबीआयच्या सूत्रांनी म्हटले आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!