Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

अखेर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि विरोधी पक्षनेते राहुल गांधी पहिल्यांदा आले एकत्र … काय झाले या बैठकीत ?

Spread the love

नवी दिल्ली : संसदेचे अधिवेशन संपल्यानंतर शुक्रवारी अनौपचारिक चहा बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी एकमेकांना अभिवादन केले. यावेळी राहुल गांधी यांनी संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांना युक्रेनमधील स्थितीबाबत विचारलं, त्यावर भारत रशिया यूक्रेन परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे असे उत्तर राजनाथ सिंह यांनी दिले . दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांना एकाच फ्रेममध्ये दाखवणारे दुर्मिळ दृश्य सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरला आहे.

संसदेचे पावसाळी अधिवेशन अनिश्चित कालावधीसाठी तहकूब करण्यात आले आहे. वक्फ बोर्ड ठरावादरम्यान वाद झाल्याने लोकसभा आणि राज्यसभेचे कामकाज तहकूब करण्यात आले. परंतु, त्यानंतर, लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी शुक्रवारी संसदेत चहापानाचा कार्यक्रम आयोजित केला होता. या कार्यक्रमात सर्वपक्षीय नेते सहभागी झाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि विरोधी पक्षनेत राहुल गांधींनीही या कार्यक्रमात उपस्थिती लावली.

https://x.com/airnewsalerts/status/1821894437758283789?

अनौपचारिक बैठकीत सत्ताधारी-विरोधक एकत्र

अनौपचारिक बैठकीचे फोटो समोर आलेत, त्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी, लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला, अमित शाह, राजनाथ सिंह, राहुल गांधी, किरण रिजिजू, पीयूष गोयल आणि चिराग पासवान बसलेले दिसतात. शुक्रवारी लोकसभेचं बजेट अधिवेशन संपलं. मागील २२ जुलैपासून सुरू असलेले हे अधिवेशन १२ ऑगस्टपर्यंत चालणार होते. परंतु शुक्रवारीच अधिवेशनाचा सूप वाजलं. १८ व्या लोकसभेच्या या अधिवेशनात सदनात अनेक विधेयके, खासगी विधेयके मांडण्यात आली.

लोकसभा अधिवेशनाचा तपशील देताना अध्यक्ष ओम बिर्लांनी सांगितले की, या संपूर्ण अधिवेशनात सभागृहाच्या १५ बैठका झाल्या, ११५ तासांचे कामकाज चालले. २३ जुलैला अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सभागृहात केंद्रीय बजेट २०२४-२५ सादर केले. सभागृहात केंद्रीय बजेटवर २७ तास १९ मिनिटे चर्चा झाली त्यात १८१ खासदारांनी सहभाग घेतला. ज्याचे उत्तर अर्थमंत्र्यांनी ३० जुलैला दिले. अधिवेशन काळात एकूण १३४५ पत्र सभागृहाच्या पटलावर ठेवली.

अनुराग ठाकूर यांचा राहुल गांधींवर आरोप

लोकसभेच्या शून्य प्रहरात भाजपा खासदार अनुराग ठाकूर यांनी विरोधी पक्षनेते आणि काँग्रेस खासदार राहुल गांधी यांच्यावर आरोप केले. बांगलादेशातील अल्पसंख्याकांच्या सुरक्षेबाबत ते सभागृहात काहीच बोलले नाही. जेव्हा बांगलादेशात अंतरिम सरकारनं कार्यभार हाती घेतला. तेव्हा पंतप्रधानांनी त्यांचे अभिनंदन केले. परंतु त्याचसोबत अल्पसंख्याकांवरील होणारे हल्ले रोखण्याचं आवाहन केले असं अनुराग ठाकूर यांनी सांगितले. दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी, राहुल गांधी यांचे चहाच्या बैठकीतले फोटो सोशल मीडियात व्हायरल होत आहे.

पावसाळी अधिवेशन पुढे ढकलल्यानंतर, लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्यासोबत झालेल्या चहापानाला पंतप्रधान नरेंद्र मोदी, काँग्रेसचे खासदार आणि विरोधी पक्षनेते राहुल गांधी, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, गृहमंत्री अमित शहा आणि इतर अनेक नेते उपस्थित होते, असे IANS आणि ऑल इंडिया रेडिओने पोस्ट केले. या बैठकीत कोणत्या विषयावर चर्चा झाली याबाबत अधिकृत माहिती मिळालेली नाही. परंतु, संसदेच्या नियमानुसार अधिवेशन संपल्यानंतर आयोजित केलेल्या चहापानाच्या कार्यक्रमात यंदा सर्वपक्षीय नेते उपस्थित असल्याचं दिसलं.

संसदेचे पावसाळी अधिवेशन तहकूब

२२ ऑगस्ट सुरू झालेले संसदेचे पावसाळी अधिवेशन १२ ऑगस्ट रोजी संपणार होते. परंतु, ते आज ९ ऑगस्ट रोजीच तहकूब करण्यात आले. कसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी सभागृहाचे कामकाज अनिश्चित काळासाठी तहकूब केले. तसंच, राज्यसभेचे कामकाजही तहकूब करण्यात आले.

१८व्या लोकसभेच्या दुसऱ्या सत्राच्या समारोपाचं भाषण देताना लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी माहिती दिली की सुमारे ११५ तास चाललेल्या या अधिवेशनात १५ बैठका झाल्या. तर, अधिवेशनादरम्यान सभागृहाची उत्पादकता १३६ टक्के होती, अशी माहिती बिर्ला यांनी एएनआयला दिली.

राज्यसभेत काय घडलं?

दरम्यान, आज पुन्हा एकदा राज्यसभेचे सभापती जगदीप घनखड यांनी जया बच्चन यांच्या नावाचा उल्लेख करताना ‘जया अमिताभ बच्चन’ असा केला. यावर बोलताना, जया बच्चन यांनी पुन्हा आक्रमक होत नाराजी व्यक्त केली. मी जया अमिताभ बच्चन, आज हे सांगू इच्छिते की मी एक कलाकार आहे. मला इतरांची देहबोली आणि चेहऱ्यावरील हावभाव समजतात. तुम्ही ज्या पद्धतीने बोलत आहात, मला पण तुमचा बोलण्याचा टोन हा मान्य नाही. आपण सहकारी आहोत, असं त्या म्हणाल्या.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!