संदिपान भुमरे यांनी औरंगाबादच्या पालकमंत्रिपदाचा राजीनामा, कोण आहेत नवे पालकमंत्री ?

औरंगाबाद : शिवसेना शिंदे गटाचे नेते संदिपान भुमरे यांनी औरंगाबादच्या पालकमंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे. संदिपान भुमरे यांची खासदारपदी निवड झाल्यानंतर त्यांनी पालकमंत्रिपदाचा राजीनामा दिला असून अब्दुल सत्तार आता नवे पालकमंत्री असतील. शिवसेनेचे नेते संदिपान भूमरे यांची खासदारपदी निवड झाली आहे. त्यानंतर त्यांनी आपल्या आमदारकीचा राजीनामा दिला होता. आता छत्रपती संभाजीनगरच्या पालकमंत्रिपदाचाही राजीनामा त्यांनी दिला. संदिपान भूमरे यांनी लोकसभेच्या निवडणुकीत इम्तियाज जलील आणि ठाकरे गटाच्या चंद्रकांत खैरे यांचा पराभव केला होता. खासदारपदी निवड झाल्यानंतर त्यांनी आमदारकीचा राजीनामा दिला होता. पण पालकमंत्रिपदाचा अद्याप राजीनामा दिला नव्हता. आता त्यांनी पालकमंत्रिपदाचाही राजीनामा दिला आहे.
अब्दुल सत्तार नवे पालकमंत्री
संदिपान भूमरे यांच्या राजीनाम्यानंतर आता शिंदेंच्या शिवसेनेचे नेते अब्दुल सत्तार यांच्याकडे पालकमंत्रिपदाची धुरा सोपवण्यात आली आहे. अब्दुल सत्तार यांच्याकडे हिंगोलीचे पालकमंत्रिपदही आहे. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांच्याकडे ही जबाबदारी देण्यात आल्याची चर्चा आहे.
एकनाथ शिंदे यांचे आम्ही नऊ रत्न असून संदिपान भूमरेंच्या रुपात एक रत्न आम्ही दिल्लीला पाठवल्याचं वक्तव्य या आधी अब्दुल सत्तार यांनी केलं होतं. त्यामुळे छत्रपती संभाजीनगरच्या पालकमंत्रिपदाची जबाबदारी आपल्याला मिळावी अशी इच्छा अब्दुल सत्तार यांनी व्यक्त केली होती. आता सत्तार यांची इच्छा पूर्ण झाली असून त्यांच्याकडे जिल्ह्याच्या पालकमंत्रिपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.
आतापर्यंत आठ आमदारांचा राजीनामा
लोकसभेच्या निवडणुकीनंतर खासदारपदी निवडून गेलेल्या काही आमदारांनी त्यांच्या आमदारपदाचा राजीनामा दिला आहे. तर लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी राजू पारवे यांनी आधीच राजीनामा दिला होता, पण त्यांचा पराभव झाला. राजीनामा दिलेल्या आमदारांची यादी पुढील प्रमाणे