ओबीसीमधून आमच्या हक्काचे आरक्षण द्या अन्यथा विधानसभेत दुसरा झटका , जरांगे पाटील यांचा इशारा….

नांदेड : ओबीसीमधून आमच्या हक्काचे आरक्षण द्या, मराठा समाज तुम्हाला डोक्यावर घेईल, पण मराठा समाजाला त्रास दिला तर एक झटका बसला आता विधानसभा निवडणुकीत बसेल असा इशारा मराठा आंदोलक मनोज जरंगे पाटील यांनी दिला आहे. मराठा समाजाच्या सोबत राहील त्याच्या सोबत मराठा समाज राहील. जर आरक्षण न दिल्यास एका बदल्यात दहा जणांना पडणार असेही जरांगे यांनी म्हटले आहे.
आपल्या भाषणा दरम्यान त्यांनी महाविकास आघाडीला देखील खडेबोल सुनावले. महाविकास आघाडीवाले विजयाच्या गाफिल मध्ये राहू नये. मराठा समाजासोबत शेवटपर्यंत सोबत न राहिल्यास महायुती सोबतच महाविकास आघाडीलाही विधानसभेत पाडा, असे जरांगे पाटीलयांनी म्हटले आहे.
नांदेड येथील सभेत जरांगे पाटील यांनी पुन्हा छगन भुजबळ यांच्यावर निशाणा साधला ते म्हणाले की , त्यांच्या खुशाल मुका घ्या, त्यांना कडेवर बसवा, आम्हाला काही घेणे देण नाही. मराठा आरक्षणाचे ते खरे मारेकरी आहेत, त्यांना थांबवा . त्यांना बळ देऊन जर मराठा समाजा विरोधात षडयंत्र रचत असाल तर आम्ही ठरवू विधानसभेच्या २८८ जागा कशा पाडायच्या, अशा सूचक शब्दात मनोज जरांगे पाटील यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना इशारा दिला. सोमवारी सकल मराठा समाजाच्या वतीने नांदेडमध्ये मराठा आरक्षण जनजागृती आणि शांतता रॅली काढण्यात आली. या रॅलीच्या समारोप प्रसंगी आपल्या भाषणादरम्यान मनोज जरांगे पाटील यांनी हा इशारा दिला.
जरांगे पुढे म्हणाले की, समाजातील ५४ लाख मराठ्यांची नोंदी सापडल्या आहेत, ही नोंदी रद्द करण्याची मागणी छगन भुजबळ करत आहेत. त्यांच्या या मागणीला सरकारचा पाठिंबा असल्याचे दिसत आहे. अंतरवाली सराटी येथे शांततेत आंदोलन सुरु असताना त्याच्या बाजुला ओबीसीचे आंदोलन बसवले आहे. मराठ्यांशी दंगल घडवण्यासाठी मोठे षडयंत्र असल्याचा आरोप जरांगे यांनी यावेळी केला. छगन भुजबळ यांना बळ देऊ नये अशी विनंती देखील जरांगे यांनी आपल्या भाषणादरम्यान केली. छगन भुजबळ सारखे नेते मराठा समाजा विरोधात बोलत आहेत. मरठ्यांना नेरेटिव्ह पसरवत आहे. मात्र याचा रोष फडणवीस यांच्याकडे जातं आहे. नेरेटिव्ह भरवण्याच्या नादात राज्यात भाजप संपत आहे, अशी टीका जरांगे यांनी केली.