Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

AccidentNewsUpdate : देवदर्शन घेऊन निघालेल्या कारला भीषण अपघात , पाच ठार , सहा जखमी

Spread the love

सोलापूर : पंढरपूरच्या दिशेने तुळजापूर देवदर्शन उरकून सोनारसिद्धचे दर्शन घेऊन निघालेल्या भाविकांच्या कारला समोरून भरधाव कारची जोरात धडक बसली. या भीषण अपघातात पाच जणांचा जागीच मृत्यू झाला तर सहा जण गंभीर जखमी झाले.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार , हा अपघात गुरुवार, ३० मे रोजी सायंकाळी ६ वाजण्याच्या सुमारास मोहोळ तालुक्यात शेटफळ हद्दीत झाला. अपघातातील कार (एम. एच. १२ / एच. एफ. ३४९६) मधून ३० मे रोजी ११ भाविक हे तुळजापूर येथे देवदर्शन उरकून पुढे कुर्डवाडीत सोनारसिद्ध येथे गेले. तेथील देवदर्शन उरकून पुढे पंढरपूरला जात असताना सायंकाळी ६ वाजता आष्टी गावच्या हद्दीत कारमधील लहान मुलगा सिद्धार्थ मारुती सूर्यवंशी (वय ६ महिने) हा खूप रडू लागल्यामुळे चालक विशाल माने याने कार रस्त्याच्या डाव्या बाजूस उभी केली. त्याचवेळी समोरून येणाऱ्या भरधाव कार (एम एच ०१ / बी. के. ८५८२) ने राँग साइडने येऊन धडक दिली.

या अपघातात सृष्टी अण्णा सूर्यवंशी (वय ७, रा. लांडेवाडी, ता. खटाव), जगूबाई धनाजी सूर्यवंशी (वय ५०, रा. मासुरणे, ता. खटाव), विशाल राजाराम माने (वय ३०, रा. मासुरणे), सुवर्णा पांडुरंग बाबर (वय ४२, रा. वाळूज, ता. खानापूर, जि सांगली), लहान बाळ सिद्धार्थ आणा सूर्यवंशी (वय ६ महिने, लांडेवाडी, ता. खटाव) हे पाच जण जागीच ठार झाले तर कोंडाबाई किसन पवार (वय ७०, रा. मासुरणे), सुनीता अण्णा सूर्यवंशी (वय ४५, रा. लांडेवाडी, ता. खटाव), अजय धनाजी सूर्यवंशी (वय २५, रा. मासुरणे), ऋतुजा विशाल माने (वय २३, रा. मासुरणे), त्रिशा पांडुरंग बाबर (वय १३, रा. वाळूज, ता. खानापूर), आदविका विशाल माने (वय अडीच वर्षे, रा, मासुरणे) हे सहा जण गंभीर जखमी झाले असून त्यांना खासगी रुग्णालयात उपचारासाठी हलविण्यात आले आहे.

 

आपलं सरकार

Click to listen highlighted text!