MumbaiNewsUpdate : सायन हॉस्पिटल डीनच्या कारने घेतला महिलेचा बळी , सीसीटीव्ही फुटेजमुळे उघडकीस आली घटना , डॉ. ढेरे यास अटक

मुंबई : मुंबईत सायन हॉस्पिटलचे डीन राजेश डेरेंच्या कार धडकेत एका महिलेचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. सायन हॉस्पिटसलच्या गेट नंबर सातवर शुक्रवारी रात्री 8.30 वाजता हा अपघात घडला. मात्र अपघाताच्या 14 तासांनंतर डीनकडून याबाबत पोलिसांना माहिती देण्यात आली. दरम्यान अपघाताप्रकरणी राजेश डेरेंविरोधात गुन्हा दाखल झाला असून सायन पोलिसांनी त्यांना अटक केली आहे.
रुबेदा शेख (वय 60) असे मृत झालेल्या महिलेचं नाव असून त्या शुक्रवारी सायन रुग्णालयातून उपचार घेऊन घरी निघाल्या होत्या. त्याचवेळी सायन हॉस्पिटलचे डीन डॉ. राजेश डेरेंच्या निष्काळजीमुळे त्या महिलेचा मृत्यू झाला. राजेश डेरे यांच्या विरोधात सायन पोलिसांनी कलम 304 A, 338, 177, 279, 184, 203 अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांपासून दडवून ठेवली माहिती..
डॉ. राजेश डेरे यांनी या अपघाताबद्दल माहिती पोलिसांपासून लपवल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. मात्र महिलेच्या बॉडीवर असलेल्या जखमावरून पोलिसांनी अपघाताचा अँगलने तपास सुरू केला. या भागातले सीसीटीव्ही फुटेज चेक केल्यानंतर डॉ. डेरेंच्या कारमुळे अपघात झाल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर सायन पोलिसांनी राजेश डेरे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करून त्यांचा शोध सुरू केला आहे.
सायन पोलिसांनी सकाळी अकरा वाजता महिलेचा मुलाला या घटनेबद्दल माहिती दिली. मृत रुबेदा शेख यांचा मुलगा सहनावाज शेख यांनी डॉ. राजेश ढेरे यांच्यावर हत्येच्या गुन्हा दाखल करा, असा आरोप करत मागणी केली होती. त्यानंतर सायन पोलिसांनी डॉ. राजेश ढेरे यांच्यावर निष्काळजीपणामुळे मृत्यू झाल्याचा गुन्हा दाखल करत डॉ. राजेश ढेरे यांना अटक केली आहे.
महिलेचा जागेवरच मृत्यू
आरोपी डॉक्टर राजेश ढेरे हा दारू पिऊन गाडी चालवत होते का या संदर्भात सायन पोलिसा पुढील तपास आणि सर्व टेस्ट करत आहेत. सायन पोलिसांनी या प्रकरणात सुरुवातीला एक्सीडेंटल आणि डॉक्टरांच्या निष्काळजीमुळे मृत्यू झाल्याचा केस दाखल करून पुढील तपास सुरु केला. त्यानंतर आता या प्रकरणात सायन पोलिसांना डॉक्टरला अटक केली आहे.
पु्ण्यामध्ये एका बिल्डरच्या अल्पवयीन मुलाने दारूच्या नशेत दोघांना उडवल्याची घटना ताजी असतानाच त्यानंतर नागपुरातही तीन मद्यधुंद तरूणांनी नागपुरातल्या गर्दीच्या महल परिसरात बेजबाबदार पद्धतीने गाडी चालवली आणि तिघांना उडवले तर आता सायन हॉस्पिटलच्या डीनने महिलेला धडक मारत तिचा जीव घेतला.