Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

बहुचर्चित महादेव बेटिंग अ‍ॅप प्रकरणी पुणे ग्रामीण पोलिसांकड़ून ७० जणांना अटक

Spread the love

पुणे : बहुचर्चित महादेव बेटिंग अ‍ॅप प्रकरणी पुणे ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेचे पथक नारायणगावात पोहचले. या ठिकाणी नारायणगाव येथील एका बड्या व्यापाऱ्यासह सुमारे ७० जणांना पोलिसांनी अटक केली आहे. महादेव अ‍ॅप प्रकरणात बॉलीवूडमधील अनेक जण रडारवर होते. या प्रकरणात अभिनेता रणबीर कपूर, श्रद्धा कपूर, कपिल शर्मा यांची नावे घेतली जात होती.

महादेव बेटिंग प्रकरणात देशातील विविध राज्यांसह परदेशातही कारवाई करण्यात आली होती. या प्रकरणाचे पुणे कनेक्शन समोर आले आहे. पुणे ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेने नारायणगाव येथे छापेमारी केली. नारायणगावमधील एका इमारतीतून महादेव बेटींग अ‍ॅपचे काम सुरु होते. या इमारतीमध्ये काम करणारे जवळपास 70 जणांना अटक करण्यात आली. त्यात एका मोठा व्यापारी आणि त्याच्या कुटुंबातील दोन व्यक्तींना ताब्यात घेतले आहे.

छत्तीसगडमधील भिलाई येथील सौरभ चंद्राकर आणि रवी उप्पल यांनी महादेव बेटिंग ॲप सुरु केले. दुबईत बसून ते या ॲपचे काम करत होते. या ॲपसाठी त्यांनी मलेशिया, थायलंड, भारत आणि UAE मध्ये कॉल सेंटर्स उघडली होती. त्या माध्यमातून ऑनलाइन सट्टेबाजी करत होते. या ऑनलाईन बेटिंग ॲपच्या माध्यमातून कोट्यवधी रुपयांचे मनी लाँडरिंग त्यांनी केल्याचे अंमलबजावणी संचालयानलयाने केलेल्या तपासात उघड झाले.

सौरभ चंद्राकर याने अनिल आणि सुनील दमानी यांच्या मदतीने बोगस बँक अकाऊंट्स उघडली. या बेटींग ॲपमध्ये पोलीस, राजकारणी आणि ब्युरोक्रॅट्सनाही भागीदारी दिली होती. मग हवालाच्या माध्यमातून येणारा पैसा या बेटिंग ॲपमध्ये वापरते होते. मागील वर्षी फेब्रुवारी महिन्यात महादेव ॲपचा सर्वोसर्वा सौरभ चंद्राकर याने दुबईत लग्न केले. त्यात परफॉर्म करण्यासाठी बॉलीवूडमधील कलाकारांना चार्टर्ड प्लेनने आणले होते. तसेच पाकिस्तानी गायक राहत फतेह अली खान आणि आतिफ असलम हे ही आले होते.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!