दिल्ली दारू धोरण : मनीष सिसोदिया यांच्या न्यायालयीन कोठडीत ७ मे पर्यंत वाढ

नवी दिल्ली : दिल्ली दारू धोरणाशी संबंधित सीबीआय प्रकरणात सध्या आरोप निश्चित करू नयेत, अशी मागणी करणाऱ्या याचिकेवर राऊस अव्हेन्यू कोर्टाने केंद्रीय तपास यंत्रणेकडून उत्तर मागितले आहे. या प्रकरणी न्यायालयाने मनीष सिसोदिया यांच्या न्यायालयीन कोठडीत ७ मे पर्यंत वाढ केली आहे.
आरोपीच्या वकिलाने सुनावणीदरम्यान न्यायाधीशांना सांगितले की, आम्ही कोर्ट रूममधून बाहेर पडायला नको होते. याबद्दल आम्ही माफीही मागतो. यावर नाराजी व्यक्त करत न्यायमूर्ती म्हणाले की, अशा प्रकारची वागणूक आपण प्रथमच पाहिली आहे. तुमचा युक्तिवाद पूर्ण होताच तुम्ही कोर्टातून बाहेर पडलात. दरम्यान, याचिकाकर्त्याने असा युक्तिवाद केला की अद्याप तपास सुरू आहे. तर सीबीआयने या युक्तिवादाला विरोध केला.
कोणी काय युक्तिवाद दिला?
याचिकाकर्त्याच्या वकिलाने न्यायालयाला सांगितले की, या प्रकरणाच्या सुनावणीदरम्यान आयओने तीन-चार महिन्यांत तपास पूर्ण होईल, असे सांगितले होते, परंतु आतापर्यंत या प्रकरणाचा तपास सुरू आहे. ते पुढे म्हणाले की, न्यायालयाच्या आदेशानंतर या प्रकरणी अटक करण्यात आली असून 164 चा जबाबही नोंदवण्यात आला आहे. अशा स्थितीत या खटल्यातील आरोप निश्चित करण्याबाबतची सुनावणी आता सुरू होऊ नये.
तर सीबीआयने या याचिकेला विरोध करत जे आरोपपत्र दाखल केले आहे त्यावरच आम्ही युक्तिवाद करू असे सांगितले. युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायालयाने सांगितले की, आम्हाला अद्याप याचिकेची प्रत मिळालेली नाही. या प्रकरणाची पुढील सुनावणी ७ मे रोजी होणार आहे.
खरं तर, आम आदमी पार्थी (आप) नेते मनीष सिसोदिया यांना बुधवारी (24 एप्रिल, 2024) तिहार तुरुंगातून व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे राऊस एव्हेन्यू कोर्टात हजर करण्यात आले. याप्रकरणी आप नेते सिसोदिया यांना गेल्या वर्षी फेब्रुवारीमध्ये अटक करण्यात आली होती.