Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

Loksabha2024LiveUpdate : दुपारपर्यंतचे मतदान कुठे किती झाले ? मणिपूरमध्ये , पश्चिम बंगालमध्ये हिंसाचार चौघांचा मृत्यू …

Spread the love

पहिल्या टप्प्यातील एकूण ५ लोकसभा मतदारसंघनिहाय टक्केवारी
रामटेक :  ४०. १० टक्के

नागपूर : ३८. ४३ टक्के

भंडारा- गोंदिया : ४५ .८८ टक्के

गडचिरोली- चिमूर : ५५ .७९ टक्के

चंद्रपूर : ४३.४८ टक्के

मणिपूरमध्ये मतदान केंद्रावर गोळीबार, तीन मतदारांचा मृत्यू

मुंबई : आज लोकसभा निवडणूक 2024 चा पहिला टप्पा आहे. या टप्प्यात 21 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशातील 102 जागांवर मतदान होत आहे. पहिल्या टप्प्यात 1600 हून अधिक उमेदवार रिंगणात आहेत. या टप्प्यात नऊ केंद्रीय मंत्री, दोन माजी मुख्यमंत्री आणि एका माजी राज्यपालांचे भवितव्य पणाला लागले आहे. सकाळी 7 वाजता मतदानाला सुरुवात झाली असून, ती सायंकाळी 6 वाजेपर्यंत सुरू राहणार आहे. आज अरुणाचल प्रदेश आणि सिक्कीमच्या विधानसभेच्या 92 जागांवरही मतदान होत आहे.

निवडणूक आयोगाच्या म्हणण्यानुसार, पहिल्या टप्प्यात 16.63 कोटीहून अधिक मतदार आहेत. यामध्ये 8.4 कोटी पुरुष आणि 8.23 ​​कोटी महिला मतदार आहेत. त्यापैकी 35.67 लाख मतदार असे आहेत जे पहिल्यांदाच मतदान करणार आहेत. तर 20 ते 29 वयोगटातील मतदारांची संख्या 3.51 कोटी आहे. यासाठी १.८७ लाख मतदान केंद्रे तयार करण्यात आली आहेत.

लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात पूर्व विदर्भातील नागपूर, रामटेक, भंडारा-गोंदिया, गडचिरोली-चिमूर आणि चंद्रपूर या पाच मतदारसंघातही आज मतदान होईल. 2019 च्या निवडणुकीत पाच पैकी चार जागा भाजप-सेना युतीने तर एका जागा काँग्रेसने जिंकली होती. 2024 मध्ये चित्र वेगळे आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, राज्याचे वनमंत्री सुधीर मुनंगटीवार हे रिणांगणात आहेत.

नक्षलग्रस्त भागात 3 वाजेपर्यंतच मतदान

मतदानाची वेळ सकाळी 7 ते सायंकाळी 6 अशी आहे. मात्र, गडचिरोली-चिमूर मतदारसंघातील आमगाव, आरमोरी, गडचिरोली आणि अहेरी ही चार विधानसभा क्षेत्रे नक्षलग्रस्त आहेत. त्यामुळे सुरक्षेच्या दृष्टीने तेथे सकाळी 7 वाजता मतदान सुरू होईल आणि दुपारी 3 वाजता संपेल. ब्रह्मपुरी आणि चिमूर या दोन विधानसभा क्षेत्रांत मात्र सायंकाळी 6 पर्यंत मतदान होईल.

पाच मतदार सांघातील लढती

नागपूर मतदारसंघ
महायुतीचे नितीन गडकरी विरुद्ध महाविकास आघाडीचे विकास ठाकरे

रामटेक मतदारसंघ
महायुतीचे राजू पारवे विरुद्ध महाविकास आघाडीचे शामकुमार बर्वे

चंद्रपूर-वणी-आर्णी मतदारसंघ

महायुतीचे सुधीर मुनगंटीवार विरुद्ध महाविकास आघाडीचे प्रतिमा धानोरकर

भंडारा-गोंदिया मतदारसंघ

महायुतीचे सुनील मेंढे विरुद्ध महाविकास आघाडीचे डॉ.प्रशांत पडोळे

गडचिरोली-चिमूर मतदारसंघ

महायुतीचे अशोक नेते विरुद्ध महाविकास आघाडचे नामदेव किरसान

21 राज्यांमध्ये दुपारी 1 वाजेपर्यंत सरासरी 36.96% मतदान झाले आहे.

1. त्रिपुरा-53.04%
2. पश्चिम बंगाल-50.96%
3. मेघालय-48.91%
4. मणिपूर-45.68%
5. आसाम-45.12%
6. पुडुचेरी-44.95%
7. मध्य प्रदेश-44.18%
8. जम्मू आणि काश्मीर – 43.11%
9.छत्तीसगड-42.57%
10. तामिळनाडू-39.43%
11. नागालँड-38.83%
12. उत्तराखंड-37.33%
13. उत्तर प्रदेश-36.96%
14. सिक्कीम-36.82%
15. मिझोराम-36.67%
16. अंदमान-35.70%
17. अरुणाचल प्रदेश-34.99%
18. राजस्थान-33.73%
19. बिहार-32.41%
20. महाराष्ट्र-32.36%
21. लक्षद्वीप-29.91%

लोकसभा निवडणुकीसाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी आज गांधीनगरमधून आपला उमेदवारी अर्ज भरला आहे.

मणिपूरमध्ये मतदान केंद्रावर गोळीबार, बचावासाठी मतदारांची धावाधाव

लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात शुक्रवारी मणिपूरमधील अंतर्गत मणिपूर आणि बाह्य मणिपूर या दोन मतदारसंघात मतदान होत आहे. मतदानादरम्यान, शुक्रवारी मणिपूरमधील मोइरांग विभागातील थामनपोकपी येथील एका मतदान केंद्राजवळ एका गटाने अनेक गोळीबार केला. मात्र, कोणतीही जीवितहानी झाली नाही. गोळीबारामुळे मतदानासाठी रांगा लावलेल्या मतदारांमध्ये घबराट पसरली. व्हायरल झालेल्या एका व्हिडिओमध्ये गोळीबाराच्या आवाजात लोक मतदान केंद्राबाहेर पळताना दिसत आहेत. टाईम्स नाऊच्या वृत्तानुसार, इम्फाळ पूर्व जिल्ह्यातील कंपू येथे इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रे नष्ट करण्यात आली आहे. सूत्रांनी पुढे सांगितलं की हल्लेखोरांनी मतदान केंद्रात फक्त भारतीय जनता पक्षाच्या एजंटची मागणी केली.

पश्चिम बंगालमध्ये दोन मतदान केंद्रावरील हिंसाचारात एका सीआरपीएफ जवानाचा मृत्यू झाला असल्याचे वृत्त आहे.

Leave a Reply

आपलं सरकार

Click to listen highlighted text!