Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

Aurangabad Fire Update : औरंगाबादेत एकाच कुटुंबातील 7 जणांचा भीषण आगीत मृत्यू, झोपेतच काळाने घातला घाला….

Spread the love

ई बाईकमुळे शॉर्ट सर्किटने इमारतीला भीषण आग;

छावणीतील दाना बाजार येथील घटना

घर मालक, भाडेकरु जोडप्यांनी वाचवला जीव….

औरंगाबाद : येथील छावणी भगात कपड्याच्या दुकानाला भीषण आग लागल्याची घटना घडली. यामध्ये दुकानाच्या वरच्या मजल्यावर राहणाऱ्या एकाच कुटुंबातील ७ जणांचा गुदमरून मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये तीन महिला आणि दोन मुलांचाही समावेश आहे. पहाटे ३ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली आहे. छावणी येथील दाना बाजार गल्लीतील महावीर जैन मंदिरच्या बाजूला ही इमारत आहे.

प्रत्यक्षदर्शी आणि पोलिसांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार चार्जिंगला लावलेल्या स्कूटीने पेट घेतल्यामुळे ही आग लागली. या घटनेत एकाच वेळी सात जणांचा धक्कादायक  मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेतली. मात्र, तोपर्यंत सात जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. मृतदेह शासकीय घाटी रुग्णालयात पाठवण्यात आले असून पोलिसांकडून पंचनामा केला जात आहे.

या आग लागलेल्या इमारतीत एकूण १६ लोक होते. पहिल्या मजल्यावर ७ लोक होते. तर दुसऱ्या मजल्यावर ७ लोक होते आणि तिसऱ्या मजल्यावर २ लोक होते. यामध्ये दुसऱ्या मजल्यावरील सर्व सात जणांचा मृत्यू झाला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार ईलेक्ट्रीक स्कूटी चार्जींगला लावून घरमालक टेलर कुटुंबीय झोपले होते. पहाटे ३ वाजेच्या सुमारास इलेक्ट्रीक स्कूटीच्या शॉर्ट सर्किटमुळे इमारतीला भीषण आग लागून टेलर कपड्याच्या दुकानात आग लागून त्याचे लोन वरील दोन तीन मजल्यापर्यंत पोहोचले. घरमालकाच्या कुटुंबियांनी खाली येऊन आवजाल जीव वाचवला. दुस-या मजल्यावर राहणा-या कुटुंबियातील सात जणांचा होरपळून दुर्देवी मृत्यू झाला. तर तिस-या मजल्यावरील भाडे करु पती पत्नींनी शेजारील टेरीसवर उड्या मारून आपला जीव वाचवला. ही घटना छावणी परिसरातील दाना बाजार वॉर्ड क्रमाकं चार जैन मंदिर शेजारी बुधवारी घडली. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली.

मृतांमध्ये यांचा समावेश…

हमीदा बेगम अब्दुल अजीज (५०), शेख सोहेल अब्दुल अजीज (३५), रेश्मा शेख सोहेल (२२), वसीम शेख अब्दुल अजीज (३०), तनवीर वसीम शेख (२३), आसीम वसीम शेख (३), परी वसीम शेख (२) अशा सात जणांचा गुदमरून दुर्देवी मृत्यू झाला. असलम टेलर यांच्या इमारतीत त्यांच्या मालकीची किंग स्टाईल नावाचे टेलरिंग व्यवसाय आहे. खाली टेलरचे दुकान असून वरच्या मजल्यावर टेलरचे कुटुंबिय राहत होते. तर त्याच्या वरच्या मजल्यावर शेख कुटुंबिय भाड्याने राहत होते. शेख कुटुंबियांमध्ये आई, दोन मुले, दोन सुना, एक मुलगा, एक मुलगी असा परिवार राहत होता.

रेश्मा शेख होती आठ महिन्याची गरोदर..

सोहेल अब्दुल अजीज याची पत्नी रेश्मा शेख सोहेल (२२) ही आठ महिन्याची गरोदर असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. रेश्मा ही लग्नानंतर पहिल्यांदाच गरोदर होती. या घटनेमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.

टेलर यांनी त्यांची ईलेक्ट्रीक बाईक चार्जींगला लावली होती. चार्जींगचे केबल हे टेलरींगच्या दुकानातून शटर खालून आले होते. दुकानाबाहेर ईलेक्ट्रीक बाईक उभी होती. चार्जींग होतांनाच त्याचा स्फोट झाला व आग लागली अशी प्राथमिक माहिती आहे. कपड्याच्या दुकानात कच्चे कपडे आणि ग्राहकांचे शिवण्यासाठी आलेले कपडे,तसेच इतर टेलरिंग मटेरील होते. तसेच आतूनच लाकडी जीना होता. दुकान बंद असल्यामुळे काही क्षणातच आगीचा भडका उडाला आणि आगीने रौद्र रुप धारण करुन आगीमध्ये सर्व साहित्य जळून खाक झाले. दुस-या मजल्यावरील सात जणांचा गुदमरून मृत्यू झाला. पुढील तपास छावणी पोलिस करत आहेत.

आम्ही भाडेकरूंना आवाज दिला पण ते उठेलच नाही…

मी रात्री दोन सव्वा दोन वाजेच्या सुमारास दुकान बंद करुन वर गेलो. रात्री ३ वाजेच्या सुमारास आग लागली अशी आरडा ओरड झाली.आम्ही वरील भाडेकरूंना आवाज देत खाली आलो. त्यांना फोन केला परंतु दुस-या मजल्यावरील भाडेकरु उठलेच नाही. तिस-या मजल्यावरील पती पत्नी हे भाडे करु होते. त्यांनी शेजारील दुबे यांच्या इमारतीच्या टेरीसवर उडी मारून आपला जीव वाचवला. फायर ब्रिगेडच्या गाड्या थोड्या उशीरा आल्यामुळे त्यांनीही लवकर आग विझवली नाही. आणि ही दुर्देवी घटना घडली. : शेख असलम टेलर (घरमालक)

पती पत्नीने उड्या मारून जीव वाचवला…

तिस-या मजल्यावर भाडेकरू पती पत्नी राहत होते. भाडेकरूच्या पत्नीने पतीला झोपेतून उठवले सांगितले खाली काही तरी घडले खूप आवाज येत आहे. त्यावेळी मी दार उघडताच अचानक आगीचा भडका दिसला. आम्ही वर टेरीसवर जाऊन शेजारील इमारतीच्या टेरीसवर उड्या मारल्या. : इरफान खान, भाडेकरू

आग लागताच परिसरात राहणारे सामाजिक कार्यकर्ते मयंक पांडे हे मदतीला धावले. त्यांनी आरडाओरड केला त्यामुळे तिस-या मजल्यावरील भाडेकरू घराच्या बाहेर निघाले. अग्निशमनचे बंब येण्यापूर्वी पांडे यांनी मोटीरीने पाणी मारून आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला.

तपास सुरु आहे…

कॅन्टोन्मेंट परिसरात एका कपड्याच्या दुकानाला आग लागली. प्राथमिक तपासानंतर या दुर्घटनेत सात जणांचा गुदमरून मृत्यू झाला आहे. मात्र, या आगीचं कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. : मनोज लोहिया, पोलिस आयुक्त

यांनी दिल्या भेटी …

पालकमंत्री संदीपान भुमरे , मंत्री अतुल सावे, आ. संजय सिरसाट , शिवसेना नेते चंद्रकांत खैरे , खा. इम्तियाज जलील, अफसर खान आदी नेत्यांनी घटनास्थळाला भेटी दिल्या. ऐन रमजान काळात हि घटना घडल्याने शहरावर शोककळा पसरली आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!