MaharashtraNewsUpdate : ३७० लागू झाल्यानंतर काश्मीरमध्ये जमीन घेणारे महाराष्ट्र पहिले राज्य , सरकारचा मोठा निर्णय

मुंबई : अयोध्येत प्रभू रामाचे दर्शन घेण्यासाठी जाणाऱ्या महाराष्ट्रीतील भाविकांची गैरसोय होऊ नये म्हणून राज्य सरकारने अयोध्येत महाराष्ट्र भवनाची उभारणी करण्याचा निर्णय घेतला आहे.
पाठोपाठ राज्य सरकारने काश्मीरमध्ये ३७० कलम लागू झाल्यानंतर पहिल्यांदाच श्रीनगरमध्येदेखील महाराष्ट्र भवन उभारण्यासाठी जमीन घेतली असून या जमिनीवर महाराष्ट्र भवन उभारण्याची योजना आखली आहे. काल बुधवारी राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत श्रीनगरमधील महाराष्ट्र भवनाच्या उभारणीला मंजुरी देण्यात आली.
दरम्यान, काश्मीरमध्ये आपलं स्वतंत्र भवन उभारण्यासाठी जमीन खरेदी करणारे महाराष्ट्र हे देशातले पहिले राज्य ठरणार आहे. काश्मीरला भेट देणाऱ्या महाराष्ट्रातील पर्यटकांसाठी तसेच महाराष्ट्रातील अधिकाऱ्यांसाठी काश्मीरमध्ये सुविधा निर्माण केल्या जाणार आहेत.
यासाठी महाराष्ट्र सरकार जम्मू काश्मीरमध्ये जमीन खरेदी करणार आहे. या जागेवर राज्य सरकार काश्मीरमध्ये स्वतःची स्वतंत्र इमारत उभारणार आहे. काश्मीर खोऱ्यात स्वतःची स्वतंत्र राज्य इमारत असलेले महाराष्ट्र हे देशातले पहिले राज्य ठरणार आहे. श्रीनगर शहराच्या बाहेर मध्य काश्मीरमधील बडगाममध्ये महाराष्ट्र भवनाची इमारत बांधली जाणर आहे. राज्य मंत्रिमंडळाने यासाठी बुधवारी जमीन खरेदीला मंजुरी दिली आहे.
महाराष्ट्र सरकार श्रीनगर विमानतळाच्या जवळ इचगाम येथे २.५ एकर जमीन खरेदी करणार आहे. जम्मू काश्मीर सरकारने महाराष्ट्र सरकारला ८.१६ कोटी रुपयांमध्ये जमीन हस्तांतरित करण्यास मान्यता दिली आहे. महाराष्ट्रातील पर्यटक आणि अधिकाऱ्यांना आरामदायी निवास आणि सुविधा देण्यासाठी राज्य सरकार काश्मीरमध्ये हे भवन उभारणार आहे. यासह राज्य सरकार अयोध्येतही महाराष्ट्र भवन उभारणार आहे.
जम्मू काश्मीरला विशेष दर्जा देणारं कलम ३७० हटवल्यानंतर देशभरातील इतर राज्यांमधील नागरिकांसाठी काश्मीरमध्ये जमीन खरेदी करणं शक्य झालं आहे. तसेच इतर शासकीय संस्था, कंपन्या, राज्य सरकारेदेखील काश्मीरमध्ये स्थानिक प्रशासनाच्या परवानगीने जमीन खरेदी करू शकतात. परंतु, अद्याप कुठल्याही राज्य सरकारने काश्मीरमध्ये जमीन खरेदी केलेली नाही. महाराष्ट्र सरकारने मात्र ही कामगिरी केली आहे.
दिवसभरातील ताज्या आणि महत्त्वाच्या घडामोडी : www.mahanayakonline.com
Join with Mahanayak Online WhatsApp Group: https://chat.whatsapp.com/KHZm2husxzD6XiBY0eBBnZ
MahanayakOnline www.mahanayakonline.com
For advertising call now: 9421379055 | 9028150765