यावेळी लढाई माजवादी विरुद्ध समाजवादी – उद्धव ठाकरे

उद्धव ठाकरे यांनी आज संयुक्त समाजवादी संमेलनात बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर हल्लाबोल केला आहे. तोडा – फोडा राज्य करा मात्र हे जास्त काळ टिकणार नाही. जर भाजपने ईव्हीएम घोटाळा केला तर देशात असंतोष पसरेल, असे देखील उद्धव ठाकरे म्हणाले आहेत. तसेच यावेळी लढाई माजवादी विरुद्ध समाजवादी असल्याचा टोला देखील त्यांना भाजपला लगावला आहे.
भाजपने लोकसभेसाठी पहिली यादीही जाहीर केली. यात महाराष्ट्रातून कोणाचेही नाव न घेता उद्धव ठाकरे यांनी भाजपवर निशाणा साधला. भाजपच्या उमेदवारांच्या पहिल्या यादीत निष्ठावंत नितीन गडकरी यांचे नाव नाही. मात्र ज्यांनी बेहिशेबी मालमत्ता जमा केली त्या कृपाशंकर सिंह ह्यांचं नाव आहे. ही आजची भाजप आहे. असे ही ठाकरे म्हणाले.
जनतेचा रेट्या समोर कितीही मोठा हुकूमशहा असेल तर तो टिकत नाही. जशी स्टेशन्सची नाव बदलली, शहरांची नावे बदलली तसं आता ‘जुमला’चे नामकरण ‘गॅरंटी’ असे झालेले आहे, असा टोला ठाकरे यांनी मोदींना लगावला आहे.
उद्धव ठाकरे म्हणाले, ज्यावेळी देशाला लढवय्यांची गरज आहे, त्यावेळी समाजवादी गणराज्य पक्षाची स्थापना झाली आहे. यावेळी लढाई माजवादी विरुद्ध समाजवादी, अशी आहे. जनतेने ठरवायचं आहे, तुम्हाला माजलेले लोकं हवीत की तुम्हाला समजून घेणारे समाजवादी लोकं हवी आहेत?
मोदीजी फक्त गावांचे, योजनांचे नाव नाही बदलत तर त्यांनी आता जुमल्याचे नाव पण ‘गॅरंटी’ केली आहे. भ्रष्टाचार करा, भाजपमध्ये जा! तुमचा केसही वाकडा होणार नाही, ही ‘मोदी गॅरंटी’ आहे. काँग्रेसकडे जर ८०० कोटी असतील, तर भाजपकडे ८००० कोटी आहेत. मग देश कुणी लुटला? कूमशाहीला आता एकच पर्याय, लोकशाही वाचवणे, असे ठाकरे म्हणाले.
दिवसभरातील ताज्या आणि महत्त्वाच्या घडामोडी : www.mahanayakonline.com
Join with Mahanayak Online WhatsApp Group: https://chat.whatsapp.com/KHZm2husxzD6XiBY0eBBnZ
MahanayakOnline www.mahanayakonline.com
For advertising call now: 9421379055 | 9028150765