मराठा आरक्षणची झळ तीन जिल्ह्यांना, एसटी पेटवल्याने संचारबंदी लागू, संध्याकाळ पर्यंत इंटरनेट सेवाही राहणार बंद

Maratha Reservation : आता मराठा आरक्षणाबाबत मनोज जरंगे-पाटील आणखी आक्रमक झाले आहेत. सगेसोग्रे या शब्दाची अधिसूचना न दिल्याने संतप्त झालेला मराठा समाजही आक्रमक झाला असून ते आज मुंबईच्या दिशेने मोर्चा काढणार होते. पण संचारबंदी लागू केल्यामुळे जरांगे-पाटील अंतरवालीत परतले आहे. दरम्यान, याची झळ तीन जिल्ह्यांना बसत आहे.
मनोज जरांगे पाटील यांच्या २ सहकाऱ्यांना पहाटे चार वाजता पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले. शैलेंद्र पवार आणि बाळासाहेब इंगळे, असे ताब्यात घेतलेल्या आंदोलकांची नावे आहेत. दरम्यान यानंतर मराठा आंदोलक आक्रमक झाले आहेत. संतप्त आंदोलकांनी जालन्याच्या अंबड तालुक्यातील तीर्थपूर येथे बस पेटवली.
मनोज जरांगे पाटील यांचा मागे फिरण्याचा निर्णय, मराठा बांधवांना आपापल्या गावी परतण्याचे केले आवाहन
अंबडमध्ये पेटवली एसटी, सर्व एसटी डेपो बंद
दरम्यान, आज सकाळी आंदोलकांनी अंबडमध्ये एसटी पेटवल्यामुळे वातावरण तंग झाले आहे. त्यानंतर हिंसा भडकू आणि पसरू नये यासाठी अंबडमध्ये संचारबंदी लागू करण्यात आली आहे.
तसेच छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सर्व एसटी डेपोतील वाहतूक बंद करण्यात आली आहे. त्यामुळे प्रवाशांचे अतोनात हाल सुरू झाले आहेत. हजारो प्रवासी जिल्ह्यातील वेगवेगळ्या डेपोमध्ये अडकले आहेत.
इंटरनेट सेवा बंद
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सर्व डेपोंतील एसटीची सेवा बंद केल्यानंतर तीन जिल्ह्यांतील इंटरनेटची सेवादेखील बंद करण्यात आली आहे. छत्रपती संभाजीनगर, जालना आणि बीडमधील इंटरनेट सेवा बंद करण्यात आली आहे. ही सेवा संध्याकाळी 4 वाजेपर्यंत बंद ठेवण्यात आली आहे.
मराठा आंदोलनाची झळ आता तीन जिल्ह्यांना बसू लागली आहे. आता मराठा आरक्षणाचे आंदोलन आणखी पेटले तर एसटीची सेवा, इंटरनेट सेवेचे काय होणार याची चिंता छत्रपती संभाजीनगर, जालना आणि बीडमधील रहिवाशांना लागली आहे.
दरम्यान, जरांगे-पाटील यांना अंतरवाली सराटीमध्ये थांबावे लागल्याने त्यांनी उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांवर प्रचंड आगपाखड केली आहे. आता यानंतर जरांगे-पाटील कोणती भूमिका घेणार याची सर्वांना उत्सुकता लागली आहे.
शांत रहा, आंतरवालीत बैठक घेऊ त्यानंतर भूमिका स्पष्ट करू
मराठ्यांनी शांत रहा, आंतरवालीत बैठक घेऊ, त्यानंतर भूमिका स्पष्ट करू, असे आवाहन मनोज जरांगे पाटील यांनी केले आहे. शांततेत मराठा आंदोलकांनी धरणे आंदोलन करावे. अंबडमध्ये संचारबंदीची काय गरज आहे.
फडणवीसांच्या आदेशानंतर संचारबंदी लागू करण्यात आली आहे. त्यांच्याबद्दल नाराजीची लाट आहे. आपला एकहीप माणूस अडचणीत येऊ नये. पोलिस काय म्हणतात ते समजून घेतो. पोलिसांना त्रास देऊ नका, असेही जरांगे पाटील यांनी आवाहन केले आहे.
मराठा आरक्षणासाठी उपोषणाचे अस्र बाहेर काढलेल्या मनोज जरांगे-पाटील अजून आंदोलन मागे घेतलेले नाही. आज ते मुंबईला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या ‘सागर’ बंगल्यावर धडकणार होते. मात्र, अंबड तालक्यात संचारबंदी लागू केल्याने जरांगे-पाटील पुन्हा अंतरवाली सराटीमध्ये परतले आहेत. तसेच मुंबईला रवाना झालेल्या तमाम मराठा बांधवांना मनोज जरंगे यांनी आपापल्या गावी परतण्याचे आवाहन केले आहे.
दिवसभरातील ताज्या आणि महत्त्वाच्या घडामोडी : www.mahanayakonline.com
Join with Mahanayak Online WhatsApp Group: https://chat.whatsapp.com/KHZm2husxzD6XiBY0eBBnZ
MahanayakOnline www.mahanayakonline.com
For advertising call now: 9421379055 | 9028150765