राजस्थानच्या इंस्टाग्राम इन्फ्लुएन्सरची भरदिवसा गोळ्या झाडून हत्या

राजस्थान : एका इंस्टाग्राम इन्फ्लुएन्सरची भरदिवसा दुकानामध्ये घुसून गोळ्या झाडून हत्या केल्याची घटना समोर आली आहे. अनामिक बिश्नोई असे मृत महिलेचे नाव आहे. राजस्थानच्या फलोदी येथील या घटनेने खळबळ उडाली आहे.
अनामिकाच्या पतीनेच घरगुती वादातून ही हत्या केल्याचे समोर आले आहे. अनामिकाचे इंस्टाग्रामवर जवळपास १ लाख ६ हजार फॉलोअर्स आहेत. अनामिकाच्या हत्येच सीसीटीव्ही फुटेजही समोर आले आहे.
फलोदी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील नागौर रोडवरील सिटी पॉइंटजवळ रविवारी दुपारी ही घटना घडली आहे. अनामिका फलोदी येथील सिटी पॉइंटजवळ नारी कलेक्शन नावाने दुकान चालवत होती.
तिथेच तिचा पती महिराम बिश्नोईने तिला गोळ्या घातल्या. अनामिकाचा जागीच मृत्यू झाला. त्यानंतर महिरामने घटनास्थळावरुन पळ काढला. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यावेळी अनामिका दुकानात रक्ताच्या थारोळ्यात पडलेली आढळली. रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अनामिकाचा पती महिराम दुपारी १२ वाजता दुकानात आला होता. जिथे दोघांमध्ये वाद झाला. त्यानंतर दुपारपर्यंत अनामिक बाहेर आलीच नाही. त्यामुळे शेजारी दुकानातील काही जणांना दुकानात पाहिले त्यावेळी घटनेची माहिती मिळाली.
अनामिका आणि महिराम यांचे १३ वर्षांपूर्वी लग्न झाले होते. दोघांमध्ये दोन वर्षांपासून वाद सुरू आहे. दोघांना दोन मुले देखील आहेत. अनामिका आपल्या दोन मुलांसह वेगळी राहत होती. या प्रकरणी पोलीस घटनेचा अधिक तपास करत आहेत.
https://twitter.com/gyanu999/status/1762006108011717055
दिवसभरातील ताज्या आणि महत्त्वाच्या घडामोडी : www.mahanayakonline.com
Join with Mahanayak Online WhatsApp Group: https://chat.whatsapp.com/KHZm2husxzD6XiBY0eBBnZ
MahanayakOnline www.mahanayakonline.com
For advertising call now: 9421379055 | 9028150765