देवेंद्र फडणवीसांनी दिले मनोज जरांगेंवर कारवाईचे संकेत

मनोज जरांगे पाटील मुंबईकडे फडणवीसांच्या सागर बंगल्याच्या दिशेने रवाना झाले आहेत. जरांगे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर गंभीर आरोप केले असून त्यांच्या सागर बंगल्याच्या दिशेने रवाना झाले आहेत. दरम्यान, देवेंद्र फडणवीसांनी मनोज जरांगे यांच्यावर कारवाईचे संकेत दिले आहे.
काय म्हणाले देवेंद्र फडणवीस?
सागर बंगला हा सरकारी आहे. कोणीही सरकारी कामाने सागर बंगल्यावर येऊ शकते याबाबत कोणाचीही अडवणुक नाही. कुठल्या निरशेतून ते बोलत आहेत, कोणती सहानुभूती हवी आहे ते मला माहिती नाही.
ते जे बोलले ते बिन बुडाचे आरोप असून धादांत खोटं आहे हे त्यांना सुद्धा माहिती आहे. मी मराठा समाजासाठी काय केले? सारथी, अण्णासाहेब पाटील मंडळ ही सुरु केली. सर्व योजनांची सुरूवात मी केल्याचे फडणवीस म्हणाले.
मराठा आरक्षण हाय कोर्टात आणि सर्वोच्च न्यायालयात सुध्दा टिकवले. त्यामुळे कोणी बोलले म्हणून मराठा समाज विश्वास ठेवेल असे म्हणणारा मी नाही. जी स्क्रिप्ट आतापर्यंत उद्धव ठाकरे, शरद पवार साहेब बोलत होते.
तीच स्क्रिप्ट ते जरांगे का बोलता आहेत हा प्रश्न आहे. आम्ही योग्यवेळी बाहेर काढू, कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पोलीस प्रशासन लागेल ते सर्व करेल, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.
सरकारने संयम ठेवलेला आहे, अंत पाहू नका- एकनाथ शिंदे
जी मागणी केली होती त्यानुसार आम्ही इतर कोणत्याही समाजाच्या आरक्षणाला धक्का न लावता दिलेला शब्द पाळला आहे. आता आरक्षण दिल्यावर मागणी बदलणे म्हणजे तुम्ही राजकारण करू लागले आहात.
मनोज जरांगे यांना कोणाचंही ऐकू नये, राज्यातील कायदा सुव्यवस्था बिघडेल असे कोणतंही कृत्य करू नये. सरकारने संयम ठेवलेला आहे अंत पाहू नका, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.
मार्ग काढायचा प्रयत्न केला – अजित पवार
यावर अजित पवार यांनी प्रतिक्रिया देत म्हणाले, सुसंस्कृत महाराष्ट्राची परंपरा सर्वानीच चालवली पाहिजे. मराठा आरक्षणाबद्दल राज्यप्रमुख एकनाथ शिंदे यांनी शिवरायांची शपथ घेतली. त्यानंतर संपूर्ण यंत्रणा कामाला लागली. मार्ग काढायचा प्रयत्न केला.
जालना येथे गेले. नवी मुंबईला गेले. तरीही शिवराळ भाषा वापरली जात आहे. आपण काय बोलतोय, कसे बोलतोय, अधिकाऱ्यांना बोलतानाही त्यांच्याशी शिवराळ भाषा वापरली जात आहे. हे नेमके कोण करतंय हे पाहणे गरजेचे आहे असे अजित पवार म्हणाले.
मराठा आंदोलन : संयमाचा अंत पाहू नका, कायद्यापेक्षा कुणीही स्वत:ला मोठे समजू नये – एकनाथ शिंदे
दिवसभरातील ताज्या आणि महत्त्वाच्या घडामोडी : www.mahanayakonline.com
Join with Mahanayak Online WhatsApp Group: https://chat.whatsapp.com/KHZm2husxzD6XiBY0eBBnZ
MahanayakOnline www.mahanayakonline.com
For advertising call now: 9421379055 | 9028150765