700 हून अधिक शेतकऱ्यांवर गंभीर कलमांतर्गत गुन्हे दाखल…

18 जानेवारी रोजी नोएडा प्राधिकरण कार्यालयाला आपल्या मागण्यांसाठी रोखणाऱ्या 746 शेतकऱ्यांवर गंभीर कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्राधिकरणाच्या जेईच्या तक्रारीनुसार पोलिसांनी गुन्हा 23 जानेवारीलाच दाखल केला होता, पण त्याबद्दल गुप्तता ठेवण्यात आली. जवळजवळ एका महिन्यानंतर एफआयआर केल्याचे समोर आल्याने पोलिसांनी केलेल्या या कारवाईमुळे शेतकरी संतप्त झाले आहेत. शेतकऱ्यांनी एफआयआर मागे घेण्याची मागणी केली आहे.
प्राधिकरणाच्या कार्यालयाला टाळे लावण्यासाठी पोहोचले होते शेतकरी
पोलिसांच्या एफआयआरमध्ये भारतीय किसान परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष सुखवीर खलीफा यांच्यासह 700 हून अधिक शेतकऱ्यांवर एफआयआर दाखल करण्यात आला आहे. प्राधिकरणाचे कनिष्ठ अभियंता अरुण वर्मा यांनी दाखल केलेल्या एफआयआरमध्ये म्हटले की, 18 जानेवारीला नोएडा प्राधिकरण कार्यालयावर टाळे लावण्यासाठी शेतकरी पोहोचले होते. दरम्यान, 700 हून अधिक जण प्राधिकरण कार्यालयाजवळ आले होते.
यामध्ये महिला, पुरुष आणि लहान मुलांचा समावेश होता. या सर्वांकडून प्राधिकरणाच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात येत होती. आम्ही कार्यालयात घुसणार आणि प्राधिकरणाला टाळे लावणार असेही म्हटले जात होते.
यावेळी पोलिसांनी सर्वांना शांत राहण्याचे आवाहन करत चर्चा करूयात असेही सांगितले होते. तरीही सर्वजणांनी आम्ही चर्चा करणार नसल्याचे म्हटले आहे. याशिवाय आमच्यामध्ये जो येईल त्याला जीवंत सोडणारन नाही असेही बोलले जात होते.
दिवसभरातील ताज्या आणि महत्त्वाच्या घडामोडी : www.mahanayakonline.com
Join with Mahanayak Online WhatsApp Group: https://chat.whatsapp.com/KHZm2husxzD6XiBY0eBBnZ
MahanayakOnline www.mahanayakonline.com
For advertising call now: 9421379055 | 9028150765