Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

GujratNewsUpdate : राम मंदिराला ११ कोटींची देणगी देणाऱ्या गोविंदभाई ढोलकियांना भाजपकडून राज्यसभा ..

Spread the love

नवी दिल्ली :  राज्यसभा निवडणुकीसाठी भाजपने गुजरातमधून चार उमेदवारांची नावे जाहीर केली. यात पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांच्यासह आणखी तीन नावांचा समावेश आहे.

गोविंदभाई ढोलकिया, मयंकभाई नायक आणि डॉ.जशवंतसिंग सलामसिंग परमार यांनाही गुजरातमधून राज्यसभेचे उमेदवार घोषित करण्यात आले आहे. यामध्ये हिरे व्यापारी गोविंदभाई ढोलकिया यांच्या नावाची जोरदार चर्चा आहे. अयोध्येत बांधलेल्या राम मंदिरासाठी ११ कोटींची देणगी दिल्यानंतर ते प्रसिद्धीच्या झोतात आले होते.

७४ वर्षीय गोविंदभाई ढोलकिया हे श्री रामकृष्ण एक्स्पोर्ट्सचे संस्थापक आहेत. त्यांनी राम मंदिरासाठी ११  कोटी रुपयांची देणगी दिली होती. दिवाळीत कर्मचाऱ्यांना भेटवस्तू देण्याबाबतही त्यांची दरवर्षी चर्चा होते. ते सुमारे ४८००  कोटी रुपयांच्या मालमत्तेचे मालक आहेत. त्यांची कंपनी SRK (श्री राम कृष्णा फाउंडेशन) अमेरिका, जपान आणि इतर देशांमध्ये हिरे निर्यात करते.

राज्यसभेचे तिकीट मिळाल्यावर गोविंदभाई काय म्हणाले?

ढोलकिया म्हणाले, “देवाच्या कृपेने माझा प्रवास खूप चांगला झाला आहे. मी शेतकरी कुटुंबातून उद्योगपती झालो. सुखी कुटुंब मिळाले. तरीही आनंदी आहे.” प्रभू रामाची तुमच्यावर कृपया आहे का ?  या  या प्रश्नाच्या उत्तरात ते म्हणाले, “भगवान श्री राम हे आमचे आवडते देव आहेत, भगवान कृष्ण देखील आमचे आवडते देव आहेत.

त्यामुळेच कंपनीचे नाव राम आणि कृष्ण दोघांनाही एकत्र ठेवून ठेवण्यात आले आहे. ५०  वर्षांपूर्वी कंपनीचे नाव दिले. मला समजल्यापासून मी राम विशेष मानतो. म्हणूनच मी सर्वांना जय राम जी म्हणतो. राम माझ्या हृदयात आहे.”

राज्यसभेसाठी त्यांच्यासोबत किती लोक शर्यतीत आहेत, या प्रश्नावर ते म्हणाले, “मला काहीच माहिती नाही. मला आजच कळले की माझ्या नावाची घोषणा होणार आहे. मी राजकारणात अजिबात नाही. आज अमित भाई  यांनी (अमित शहा) फोन केला तेव्हा मला ही समजले .”

 

 


दिवसभरातील ताज्या आणि महत्त्वाच्या घडामोडी :  www.mahanayakonline.com

Join with Mahanayak Online WhatsApp Group: https://chat.whatsapp.com/KHZm2husxzD6XiBY0eBBnZ

MahanayakOnline  www.mahanayakonline.com

For advertising call now: 9421379055 | 9028150765

आपलं सरकार

Click to listen highlighted text!