शरद पवारांना मोठा झटका, पक्ष आणि चिन्ह मिळाले अजित पवार गटाला

शरद पवारांना राजकीय धक्का बसला असून अजित पवार गटाला पक्ष आणि चिन्ह मिळाले आहे. त्यामुळे आगामी लोकसभेच्या पार्श्वभूमीवर शरद पवार यांना मोठा झटका बसला आहे.
सहा महिन्यांहून अधिक कालावधीच्या कठीण प्रक्रियेनंतर आणि 10 हून अधिक सुनावणींनंतर, निवडणूक आयोगाने (EC) राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील (NCP) दीर्घकाळ चाललेला वाद संपवला आहे. जो न्याय शिवसेनेच्या शिंदे गटाला तोच न्याय आता निवडणूक आयोगाने राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाला दिला आहे. राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्ह अजित पवार गटाला मिळाल्यामुळे येत्या निवडणुकीत शरद पवार गटाला वेगळ्या चिन्हावर आणि नावावर निवडणूक लढवावी लागेल हे स्पष्ट झाले आहे.
राष्ट्रवादी पक्षातील फुटीनंतर अजित पवार यांनी महायुतीत जाण्याचा निर्णय घेतला. दरम्यान त्यांनी, राष्ट्रवादी हा पक्ष आणि घड्याळ हे चिन्ह आपले असल्याचा दावाही केला होता. या प्रकरणी निवडणूक आयोगासमोर सुनावणी सुरू होती.
निवडणूक आयोगाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हे नाव आणि घड्याळ हे निवडूक चिन्ह अजित पवार गटाला देण्याचा निर्णय दिला आहे. त्यामुळे मूळ राष्ट्रवादी पक्षाला आता नवीन नाव आणि चिन्ह देण्यात येईल
या महत्त्वाच्या निर्णयामुळे राष्ट्रवादी काँग्रेसमधील अंतर्गत कलह तर मिटलाच, शिवाय गटबाजीने आपली दिशा ठरवल्याने राजकीय पार्श्वभूमीवर नव्या वाटचालीचा टप्पाही निश्चित झाला आहे.
दिवसभरातील ताज्या आणि महत्त्वाच्या घडामोडी : www.mahanayakonline.com
Join with Mahanayak Online WhatsApp Group: https://chat.whatsapp.com/KHZm2husxzD6XiBY0eBBnZ
MahanayakOnline www.mahanayakonline.com
For advertising call now: 9421379055 | 9028150765