भूतबाधा झाल्याचे सांगत तांत्रिकाने अल्पवयीन मुलीवर केले अत्याचार…

मध्य प्रदेशात एक लाजीरवाणी घटना समोर आली आहे. येथे एका तांत्रिकाने नववीच्या विद्यार्थिनीवर अडीच महिने बलात्कार केला. अल्पवयीन मुलगी गर्भवती राहिल्यानंतर तिने 30 जानेवारी रोजी आत्महत्या केली. आत्महत्येचा तपास करत असलेल्या पोलिसांनी शनिवारी सायंकाळी या प्रकरणाचा खुलासा केला आहे. ही घटना घडवणाऱ्या तांत्रिकाला पोलिसांनी अटक केली आहे.
अल्पवयीन मुलीला अभ्यासात मन नसल्याचे सांगण्यात येत होते, या कारणामूळे घरातील लोक तिला तांत्रिकाकडे घेऊन गेले. तांत्रिक तंत्र-मंत्राच्या नावाखाली अनेकदा घरी येऊन तिच्यावर बलात्कार करायचा.
हे प्रकरण झाबुआ जिल्ह्यातील थंडला गावातील काकनवानी पोलीस स्टेशन हद्दीतील परवालिया चौकीच्या दौलतपुरा गावातील आहे. येथे एका विद्यार्थिनीने गळफास लावून आत्महत्या केली होती.
माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून विद्यार्थ्याचा मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमार्टमसाठी पाठवला. तेथे डॉक्टरांनी अल्पवयीन विद्यार्थिनी अडीच महिन्यांची गर्भवती असल्याचे उघड केले.
पोलिसांनी या प्रकरणाचा तपास केला तेव्हा त्यांना कळले की तिला अभ्यासात रस नाही, ती नीट जेवत नाही आणि नेहमी आजारी असायची. अशा स्थितीत कुटुंबीयांनी तिला जवळच्या गावातील तांत्रिक सुनीलकडे नेले, त्याने त्या मुलीला भूतबाधा झाली आहे असे सांगितले होते.
कुटुंबीयांनी परवाळी पोलिसात तक्रार केली असून आरोपी तांत्रिक सुनीलवर तंत्र-मंत्राचा धाक दाखवून बलात्कार केल्याचा आरोप केला आहे. कुटुंबीयांचे म्हणणे आहे की हा तांत्रिक स्त्रीच्या वेशात असतो आणि बहुतेकदा मुलींना स्वतःकडे बोलवायचा . पोलिसांनी आरोपी सुनीलला अटक केली असून, त्याने इतर अनेक मुलींसोबत असे केले असल्याचे सांगितले आहे.
परवालिया पोलीस चौकीचे प्रभारी संजय राव यांनी दिलेल्या माहितीनुसार, विद्यार्थिनीच्या आत्महत्येचा तपास केला असता असे आढळून आले की, कुटुंबीयांनी तिला 4 महिन्यांपूर्वी तांत्रिकाकडे नेले होते.
आरोपी तांत्रिक हा जवळच्याच घरात राहत होता. आई-वडील कामावर निघून गेल्यानंतर तांत्रिक भूतविष्कार (भूतबाधा ) करण्यासाठी वारंवार घरात येऊ लागला आणि आई व वहिनीला जीवे मारण्याची धमकी देऊन अल्पवयीन मुलीचे सतत लैंगिक शोषण करू लागला.
या प्रकरणी कलम ३०५, ३७६, ३७६ (२), ५०६ आणि पोक्सो कायद्यान्वये गुन्हा दाखल करून आरोपी तांत्रिक सुनीलला अटक करण्यात आली असून या प्रकरणाचा अधिक तपास सुरू आहे.
दिवसभरातील ताज्या आणि महत्त्वाच्या घडामोडी : www.mahanayakonline.com
Join with Mahanayak Online WhatsApp Group: https://chat.whatsapp.com/KHZm2husxzD6XiBY0eBBnZ
MahanayakOnline www.mahanayakonline.com
For advertising call now: 9421379055 | 9028150765