Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

Shiv sena MLA Disqualification Verdict Live : शिंदे गट हा खरा शिवसेना पक्ष…

Spread the love

Shiv sena MLA Disqualification Verdict Live : मुंबई: राज्याच्या राजकारणात उलथापालथ घडवणाऱ्या शिवसेना आमदार अपात्रतेचा निकाल अखेर काही तासांवर आला आहे. आज ( बुधवारी) विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर हा निकाल देणार आहेत. या निकालावर एकनाथ शिंदे यांच्यासह 40 आणि ठाकरे यांच्यासह 14 आमदारांचे राजकीय भवितव्य अवलंबून असणार आहे. शिवसेना ठाकरे गट की शिंदे गट यातील कोणाचे आमदार अपात्र ठरणार, की काही वेगळा निकाल लागणार याची उत्सुकता सर्वांना आहे.


  • राहुल नार्वेकर यांच्या निर्णयानंतर शिंदे गटाकडून जल्लोष

  • विधिमंडळ गटनेता म्हणून एकनाथ शिंदे यांची झालेली नियुक्ती वैध होती. त्यामुळे खरा पक्ष हा त्यांचाच

    कोणता गट खरा पक्ष हे विधिमंडळ पक्ष कोणाचा यावरून ठरवता येईल जेव्हा पक्षात फूट पडते. २२ व २३ जून २०२२ रोजीचा शिंदे गटाचा ठराव विधिमंडळाच्या नोंदीवर आहे.

    ५५पैकी ३७ आमदार त्यांच्या गटात होते. म्हणून शिंदे गट हा खरा शिवसेना पक्ष होता २१ जून रोजी दोन गट निर्माण होऊन फूट पडली तेव्हा, भरत गोगावले हे वैध व्हिप होते, कारण २१ जून रोजी सुनील प्रभू यांचे व्हिप रद्द झाले.

 

  • शिंदे गटाचे १६ आमदार पात्रच; राहुल नार्वेकर यांचा आणखी एक मोठा निर्णय

  • शिंदे गटातील आमदारांना अपात्र ठरवण्यासाठी कोणताही आधार नाही

    आमदार संपर्काबाहेर गेले होते, हा ठाकरे गटाचा युक्तिवाद मान्य होऊ शकत नाही. कारण कोणाला संपर्क करण्याचा प्रयत्न केला आणि कोणी प्रयत्न केला, याबद्दल ठाकरे गटाने कोणतेही पुरावे दिले नाहीत. त्यामुळे शिंदे गटातील आमदारांना अपात्र ठरवण्यासाठी कोणताही आधार नाही.

    मिलिंद नार्वेकर व रवींद्र फाटक हे एकनाथ शिंदे व अन्य नेत्यांना ठाकरे यांच्या सांगण्यावरून भेटायला गेले होते, हे ठाकरे गटाकडून कबूलही करण्यात येत आहे. शिंदे गटातील तीन साक्षीदार आमदारांनीही हे साक्षीमध्ये सांगितले. त्यामुळे आमदार संपर्काबाहेर गेले होते, हा युक्तिवाद अमान्य करण्यासाठी हा एक आणखी आधार आहे.

  • भरत गोगावलेंना प्रतोद म्हणून मान्यता, त्यांचा व्हिप वैध – अध्यक्ष राहुल नार्वेकर

  • शिवसेना कोणाची हा निर्णय बहुमताचा विचार केला

  • मूळ राजकीय पक्ष म्हणून शिंदे गटाला मान्यता, राहुल नार्वेकर यांचा पहिला मोठा निर्णय

  • पक्षप्रमुख कुणालाही थेट पक्षातून बाहेर काढू शकत नाहीत, राष्ट्रीय कार्यकारिणीशी चर्चा करूनच हकालपट्टीचा निर्णय घेता येऊ शकतो.

  • २३ जानेवारी २०१८ रोजी शिवसेनेत अंतर्गत निवडणूक झाली नाही, त्यामुळे ती घटना वैध नाही- अध्यक्ष राहुल नार्वेकर

  • मोठी बातमी- २०१८ची घटना ग्राह्य धरण्याची ठाकरेंची मागणी अमान्य केली- अध्यक्ष राहुल नार्वेकर

  • निवडणूक आयोगाकडून मिळालेली प्रत ही शिवसेनेची खरी घटना, १९९९ साली आयोगाकडे दाखल केलेली घटना वैध, २०१८ साली करण्यात आलेले बदल ग्राह्य धरले जाणार नाहीत- अध्यक्ष राहुल नार्वेकर

  • दोन्ही गटांनी पक्षाच्या वेगवेगळ्या घटना दिल्या -विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर

  • मूळ राजकीय पक्ष कोणाचा यासाठी शिवसेनेची घटना, पक्षीय संघटना, विधिमंडळ पक्षाचा विचार केला विचार केलाय.-विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर

  • खरी शिवसेना कोणाची यावर आधी निर्णय दिला जाईल त्यानंतर आमदारांच्या अपात्रतेवर निर्णय दिला जाणार- विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर

  • या संपूर्ण प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने ज्या पद्धतीने मार्गदर्शन केले त्यासाठी राहुल नार्वेकर यांनी सर्वोच्च न्यायालयाचे आभार मानले. त्याच बरोबर विधिमंडळाचे कर्मचारी आणि दोन्ही गटांच्या वकिलांचे आभार व्यक्त केले.

  • विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी सर्वोच्च न्यायालयाचे आभार मानले

  • विधानसभा अध्यक्ष आणि वकिलांची बैठक संपली, निकाल काही क्षणात

  • निकालची वेळ साडेचारची तरी अद्याप वाचनाला सुरुवात नाही, निकाल वाचनाआधी अध्यक्षांची वरिष्ठ वकिलांशी चर्चा
  • विधान भवनात पोहोचताच शिंदे गटाचे आमदार भरत गोगावलेंनी ‘जय श्री राम’च्या घोषणा दिल्या.

  • एकूण निकाल १२०० पानांचा

    विधानसभा अध्यक्षांकडे या संदर्भात ३४ याचिका दाखल झाल्या होत्या. अध्यक्षांनी त्याची विभागणी ६ गटात केली होती. ६ गटांचे ६ स्वतंत्र निकाल वाचून दाखवले जातील, प्रत्येक गटाचा निकाल हा २००हून अधिक पानांचा, तर एकूण निकाल १२०० पानांचा असेल

  • ठाण्यातील पोलिस यंत्रणा अलर्ट मोडवर- आनंद आश्रमाची सुरक्षा व्यवस्था वाढवली

  • दोन्ही गटाचे वकील सेंट्रल हॉलमध्ये दाखल

    आमदार अपात्रता निकाल पुढील काही मिनिटात लागणार, विधानसभा अध्यक्ष फक्त ठळक मुद्दे वाचणार

  • संजय शिरसाठ यांची पत्रकार परिषद

  • आम्ही केलेला उठाव कायदेशीर -आमचीच शिवसेना खरी-आम्ही गट किंवा पक्ष स्थापन केला नाही -लटके पोटनिवडणुकीत निवडून आल्याने त्यांना व्हीप देणार नाही- अपात्र होणार हे ठाकरे गटाला समजलंय

  • संपूर्ण देशाचे लक्ष लागलेल्या निकालाचे वाचण काही मिनिटांत सुरू होणार

  • निकालाच्या आधी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या बंगल्याबाहेरील बंदोबस्त वाढवला

Shiv sena MLA Disqualification Verdict : शिवसेना आमदार अपात्रतेचा निकाल अखेर काही तासांवर…

  • पोलिस महासंचालक रश्मी शुक्ला सागर बंगल्यावर दाखल

    रश्मी शुक्ला या उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीला सागर बंगल्यावर दाखल

  • मुख्यमंत्र्यांना आरोपी म्हणणारे बिनडोक- शहाजी बापू पाटील

  • शिंदे गटाचे नेते शहाजी बापू पाटील यांनी निकालाच्या आधी एक मोठे वक्तव्य केले आहे. आम्ही कायदेशीररित्या बरोबर आहोत आणि निकाल आमच्याबाजूने लागले. मला कसलेच टेन्शन नाही, निकाल शंभर टक्के ओके लागणार. तसेच मुख्यमंत्री शिंदेंना आरोपी म्हणणारे बिनडोक आहेत, असे ते म्हणाले.

 

 


दिवसभरातील ताज्या आणि महत्त्वाच्या घडामोडी :  www.mahanayakonline.com

दिवसभरातील ताज्या News Update | Join with Mahanayak Online :

https://chat.whatsapp.com/KHZm2husxzD6XiBY0eBBnZ

MahanayakOnline
www.mahanayakonline.com

For advertising call now :
9421379055 | 9028150765

आपलं सरकार

Click to listen highlighted text!