मोठी बातमी | मनपात २८६ पदे भरण्यासाठी राज्य शासनाची मान्यता

छत्रपती संभाजीनगर : महापालिकेतील रिक्त पदे भरण्यासाठी राज्य शासनाने सुरुवातीला १२३ पदे भरण्यास मान्यता दिली होती. मात्र ही भरती प्रक्रिया सुरू झाल्यानंतर शासनाने आता २८६ पदांच्या भरतीला हिरवा कंदील दाखवला आहे. लोकसभा निवडणुकीपूर्वी रिक्त पदांसाठी भरती प्रक्रिया राबवली जाण्याची शक्यता आहे.
आता पालिकेतील मंजूर पदांची संख्या 5202 वर पोहोचली आहे. मात्र, सध्या २ हजार ९६५ कर्मचारी कार्यरत आहेत, तर २२३७ पदे रिक्त आहेत. पालिकेच्या विविध विभागातून दर महिन्याला किमान 10 ते 12 कर्मचारी निवृत्त होत आहेत.
त्यामुळे प्रशासनाने 2021 मध्ये 125 पदांसाठी भरतीचा प्रस्ताव शासनाकडे पाठविला होता. शासनाने या पदांवर भरती करण्यास मान्यता दिली आहे. ही भरती प्रक्रिया सरकारने नियुक्त केलेल्या IBPS एजन्सीद्वारे आयोजित केली जात आहे.
मनपा प्रशासक जी. श्रीकांत यांनी भरती प्रक्रिया जलद गतीने करण्यासाठी आणि आणखी २८६ पदांसाठी मंजुरी मिळावी यासाठी राज्य सरकारकडे प्रस्ताव सादर केला होता. राज्य सरकारच्या नगरविकास विभागानेही महापालिकेच्या २८६ पदांवरील भरतीला हिरवा कंदील दाखवला आहे.
शासनाने मनपाच्या आस्थापना खर्चाच्या ३५ टक्के मर्यादेची अट शिथिल करून ही मंजुरी दिली आहे. त्यामुळे लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहिता लागू होण्यापूर्वी ही भरती प्रक्रिया राबवली जाण्याची शक्यता आहे.
गट ब, क मधील मंजूर पदे
गट-ब मधील समाज विकास अधिकारी-१, प्रशासन अधिकारी (शिक्षण)-१, सहायक विधि अधिकारी-१ ही तीन पदे भरली जातील. गट-क मधील कनिष्ठ अभियंता (स्थापत्य)-३२, शारीरिक शिक्षण-६, उपअग्निशमन केंद्र अधिकारी-४, सहायक सुरक्षा अधिकारी-१, स्थापत्य अभियांत्रिकी सहायक/अतिक्रमण निरीक्षक-२४, स्वच्छता निरीक्षक- १२, पशुधन पर्यवेशक-७, चालक-यंत्रचालक-१७, अनुरेखक-९, उद्यान सहायक-९, अग्निशामक-१००, रोखपाल-१२, लिपिक टंकलेखक- ५० या प्रमाणे एकूण २८६ पदे भरण्यास मंजुरी देण्यात आली आहे.
दिवसभरातील ताज्या आणि महत्त्वाच्या घडामोडी : www.mahanayakonline.com
दिवसभरातील ताज्या News Update | Join with Mahanayak Online :
https://chat.whatsapp.com/KHZm2husxzD6XiBY0eBBnZ
MahanayakOnline
www.mahanayakonline.com
For advertising call now :
9421379055 | 9028150765