आंतरराष्ट्रीय मोटिव्हेशनल स्पीकर विवेक बिंद्राविरोधात पत्नीने केली एफआयआर दाखल

आंतरराष्ट्रीय मोटिव्हेशनल स्पीकर विवेक बिंद्रा वादात सापडला आहे. त्याच्यावर पत्नीला मारहाण केल्याचा आरोप करण्यात आला असून या प्रकरणी नोएडा येथील पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विवेक बिंद्राच्या पत्नीच्या भावाने हा गुन्हा दाखल केला आहे, यासोबतच पत्नीला मारहाण करतानाचा एक व्हिडिओ देखील सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
विवेक बिंद्राविरोधात नोएडाच्या पोलीस स्टेशन 126 मध्ये एफआयआर दाखल करण्यात आला आहे. एफआयआरनुसार, विवेक बिंद्राचा यानिकासोबत या वर्षी ६ नोव्हेंबर २०२३ रोजी विवाह झाला होता. सेक्टर 94 मधील सुपरनोव्हा अपार्टमेंटमध्ये विवेक बिंद्रा आपल्या कुटुंबासह राहतात.
तक्रारीनुसार, ७ डिसेंबर २०२३ रोजी विवेक बिंद्रा त्याची आई प्रभासोबत रात्री उशिरा कशावरून तरी वाद घालत होता. वाद वाढत गेल्याने त्याची पत्नी यानिकाने मध्ये येऊन मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला.
पत्नी यानिकाचा मध्यस्थी केल्यावर विवेक बिंद्राला राग आला आणि त्याने पत्नीला बेदम मारहाण करून घराबाहेर हाकलून दिले. या मारामारीत यानिकाला गंभीर दुखापत झाली आहे. यानंतर यानिकाने कशीतरी तिच्या कुटुंबीयांना याची माहिती दिली. घटनेची माहिती मिळताच यानिकाचे कुटुंबीय आले आणि तिला दिल्लीतील एका खासगी रुग्णालयात दाखल केले, जिथे तिच्यावर उपचार सुरू आहेत.
विवेक विरुद्ध एफआयआर कधी नोंदवला गेला?
वैभव क्वात्रा यांनी सांगितले की, त्याच्याविरुद्ध १४ डिसेंबर रोजी गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलिसांनी विवेकविरुद्ध भादंविच्या कलम ३२३, ५०४, ४२७ आणि ३२५ सह विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला असून या प्रकरणाचा तपास सुरू असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. तपासात जे काही समोर येईल त्याआधारे कारवाई केली जाईल.
संदीप माहेश्वरीसोबतही वाद चर्चेत आहे
संदीप माहेश्वरी यांनी अलीकडेच त्यांच्या चॅनलवर बिग स्कॅम एक्सपोजचा एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये दोन विद्यार्थ्यांनी विवेक बिंद्राने आपली फसवणूक केल्याचा दावा केला आहे. व्हिडीओनंतर विवेकने संदीप माहेश्वरीच्या आरोपांना प्रत्युत्तर देत त्यांचेही म्हणणे ऐकून घेतले पाहिजे, असे सांगितले.
संदीप माहेश्वरीच्या व्हिडिओत काय आहे वादग्रस्त?
संदीप माहेश्वरी विरुद्ध विवेक बिंद्रा यांच्यातील वाद काही दिवसांपूर्वी महेश्वरीने त्याच्या यूट्यूब चॅनलवर एक व्हिडिओ अपलोड केला तेव्हापासून सुरू झाला. या व्हिडिओमध्ये, दोन मुले संदीपला सांगतात की त्यांनी एका मोठ्या YouTuber कडून एक कोर्स विकत घेतला होता, पण त्याचा काही उपयोग झाला नाही. ते त्याला सेल्समन बनवत आहेत. एका मुलाने 50 हजार रुपये आणि दुसऱ्याने 35 हजार रुपयांना कोर्स घ्यायचे सांगितले होते.
Maratha Arakshan : 20 जानेवारीला मराठा मोर्चा थेट मुंबईत धडकणार
दिवसभरातील ताज्या आणि महत्त्वाच्या घडामोडी : www.mahanayakonline.com
दिवसभरातील ताज्या News Update | Join with Mahanayak Online :
https://chat.whatsapp.com/KHZm2husxzD6XiBY0eBBnZ
MahanayakOnline
www.mahanayakonline.com
For advertising call now :
9421379055 | 9028150765