India vs Afghanistan : कर्णधार हार्दिक पांड्यामुळे मुंबई इंडियन्सचे होऊ शकते नुकसान…

टीम इंडियाचा अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्या क्रिकेटपासून दूर जात आहे. २०२३ च्या विश्वचषकादरम्यान तो जखमी झाला होता. पांड्या लवकरच पुनरागमन करेल अशी अपेक्षा होती. पण आता अवघड वाटत आहे. एका रिपोर्टनुसार, हार्दिक भारत आणि अफगाणिस्तान यांच्यात खेळल्या जाणाऱ्या टी-20 मॅच केळणार नाही. भारत आणि अफगाणिस्तान यांच्यात ११ जानेवारीपासून मॅच खेळवली जाणार आहे.
हार्दिक पांड्याला टाचेला दुखापत झाली असून सध्या तो पूर्णपणे फिट असण्याची शक्यता कमी आहे. यामुळे पंड्या भारत-अफगाणिस्तान टी-20 मालिकेतून बाहेर असू शकतो. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने अद्याप पांड्याबाबत कोणतेही अपडेट दिलेले नाही तसेच अफगाणिस्तानविरुद्धच्या मालिकेसाठी संघाची घोषणाही केलेली नाही.
महत्त्वाची बाब म्हणजे पांड्याला इंडियन प्रीमियर लीग 2024 साठी मुंबई इंडियन्सने ट्रेड करून कर्णधार बनवले आहे. पांड्या फिट नसल्यास मुंबई इंडियन्सचे नुकसान होऊ शकते.
मुंबई इंडियन्सने चॅम्पियन कर्णधार रोहित शर्माला पदावरून हटवले असून त्याच्या जागी पांड्याला कर्णधार बनवले आहे. पण पांड्याचा फिटनेस संघाला धक्का देऊ शकतो.
हार्दिक पांड्याने टीम इंडियासाठी शेवटचा सामना बांगलादेश विरुद्ध 2023 वर्ल्ड कप दरम्यान खेळला होता. तेव्हापासून तो परत येऊ शकला नाही. पांड्याने शेवटचा कसोटी सामना ऑगस्ट 2018 मध्ये इंग्लंडविरुद्ध खेळला होता.
शेवटचा T20 सामना ऑगस्ट 2023 मध्ये वेस्ट इंडिजविरुद्ध खेळला गेला होता. गेल्यावेळेस तो गुजरातकडून खेळला होता. त्याने आयपीएल संघ गुजरात टायटन्सला चॅम्पियन बनवले व संघ अंतिम फेरीत पोहचले. मात्र आता तो मुंबई इंडियन्समध्ये सामील झाला आहे.
काश्मीरमध्ये मोबाईल-इंटरनेट सेवा बंद, तिसऱ्या दिवशीही भारतीय लष्कराची शोध मोहीम सुरू
दिवसभरातील ताज्या आणि महत्त्वाच्या घडामोडी : www.mahanayakonline.com
दिवसभरातील ताज्या News Update | Join with Mahanayak Online :
https://chat.whatsapp.com/KHZm2husxzD6XiBY0eBBnZ
MahanayakOnline
www.mahanayakonline.com
For advertising call now :
9421379055 | 9028150765