Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

MaharashtraNewsUpdate : आमदार अपात्रता प्रकरणी न्याय देण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने वाढवून दिला वेळ ….

Spread the love

नवी दिल्ली : सर्वोच्च न्यायालयाने शिवेसना आमदार अपात्रता सुनावणीसाठी विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकरांना 10 जानेवारीपर्यंत वेळ वाढवून दिला आहे. आमदार अपात्रता प्रकरणी निकाल देण्यासाठी मिळालेला वेळ हा पुरेसा नसून त्यासाटी विधानसभा अध्यक्षांनी 3 आठवड्यांची वाढीव वेळ मागितली होती. मात्र कोर्टाने 10 जानेवारीपर्यंतच वेळ दिला आहे. त्यामुळे शिवसेना आमदारांच्या अपात्रतेचा फैसला आता 10 जानेवारीपर्यंत होणार असल्याचे स्पष्ट आहे.

शिवसेना आमदारांच्या अपात्रतेसंबंधी निर्णय घेण्यासाठी सुप्रिम कोर्टाने विधानसभा अध्यक्षांना 31 डिसेंबरपर्यंत मुदत दिली होती. या प्रकरणात जवळपास दोन लाख कागदपत्रे असून ती तपासावी लागतील असे कारण देत विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी त्यासंबंधित निकाल देण्यासाठी वेळ वाढवून द्यावी अशी मागणी केली होती. त्यानंतर सुप्रिम कोर्टाने आता 10 जानेवारी पर्यंत वेळ वाढवून दिला आहे.

दरम्यान राहुल नार्वेकरांनी निर्णय देण्यासाठी सुप्रिम कोर्टाकडे वेळ वाढवून म्हटले होते की, आमदार अपात्रतेच्या प्रकरणी मी 20 जानेवारी पर्यंत युक्तिवाद संपवणार असून त्यावर निकाल राखून ठेवणार आहे. पण या प्रकरणात दोन लाख कागदपत्रे तपासावी लागणार असल्याने 31 डिसेंबर पर्यंत निकाल देणे मला शक्य होणार नाही. त्यामुळे तीन आठवड्याचा वेळ वाढवून द्यावा.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!