Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

Live Mahanayak Online | जाणून घ्या दिवसभरातील ताज्या आणि महत्त्वाच्या घडामोडी

Live update

Spread the love

 #MahanayakOnline | Top News | 14.December.2023 | दिवसभरातील ताज्या आणि महत्त्वाच्या घडामोडी


दिवसभरातील ताज्या घडामोडी ;

Sharad Pawar & Amit Shah meeting : शरद पवार,अमित शाहा इथेनॉल बंदीच्या निर्णयाबाबत करणार चर्चा

राज्यात निर्माण झालेला इथेनॉल प्रश्न याबाबत शरद पवार आज अमित शाहांना भेटण्याची शक्यता आहे. केंद्र सरकारने इथेनॉल बंदीचा निर्णय घेतला असून त्या संदर्भात भेट घेऊन ते साखर कारखानदारांची समस्या देखील मांडणार आहेत.

लोकसभेतल्या घुसखोरीच्या कटाचा मास्टरमाईंड दिल्ली पोलिसांच्या ताब्यात

लोकसभेत झालेल्या घुसखोरीच्या कटाचा मास्टरमाईंड ललित झा याला अटक करण्यात आली आहे. ललित घुसखोरीनंतर राजस्थानला गेला. राजस्थानला गेल्यानंतर तिथे आपल्या सहकाऱ्यांना भेटला आणि हॉटेलमध्ये राहिला. त्यानंतर पोलीस शोधत असल्याचे त्याला कळाले त्यानंतर ललित बसने दिल्लीला आला. पोलिसांनी त्यानंतर ललितला अटक केले.

 

काँग्रेस नेत्यांची नागपूरमध्ये महत्वाची बैठक

काँग्रेसचे संघटन महासचिव के सी वेणुगोपाल यांच्या उपस्थितीत राज्यातील काँग्रेस नेत्यांची नागपूरमध्ये महत्वाची बैठक होणार आहे.

भाजप पदाधिकाऱ्यांची आगामी निवडणुकांसाठी मॅरेथॉन बैठका

नागपुरात फडणवीस यांच्या घरी भाजप पदाधिकाऱ्यांची आगामी लोकसभा निवडणुकांसाठी मॅरेथॉन बैठका घेण्यात येत आहे. पदाधिकाऱ्यांना देवेंद्र फडणवीस, चंद्रशेखर बावनकुळे मार्गदर्शन करणार असून आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रणनिती ठरणार आहे.

 

बीडमधील जाळपोळ प्रकरणी विधानसभेत चर्चा

विधानसभेत आज आमदार संदीप क्षीरसागर बीडमधील जाळपोळ प्रकरणी मांडणार भुमिका.

 

 

कुंभमेळाच्या जिल्हास्तरीय समितीच्या अध्यक्षपदी गिरीश महाजन यांची नियुक्ती

आगामी कुंभमेळाच्या जिल्हास्तरीय समितीच्या अध्यक्षपदी गिरीश महाजन यांची नियुक्ती करण्यात आली आहे. 31 आक्टोंबर 2026 मध्ये नाशिकमधील त्र्यंबकेश्वर येथे कुंभमेळा होणार आहे. कुंभमेळा आरखाडा तयार करणे, कामाचे नियोजन, खर्चला मंजुरी, वेळेत काम पूर्ण करणे आदी काम चार समितीच्या माध्यमातून केली जाणार आहे.

अमरावतील शेकडो कोटींचा औद्योगिक प्रकल्प निघून गेला…

अमरावती नांदगावपेठ एमआयडीसीमध्ये (MIDC) हरमन फिनोकेम लि. कंपनीने अचानक कामकाज बंद करण्याचा निर्णय घेतल्याचे सांगण्यात येत आहे. हरमन कंपनी नांदगावपेठेत औषध कारखाना काढणार होती. कंपनीला एमआयडीसीमध्ये डी-9 भूखंड देण्यात आला होता.

कंपनीने तीन महिन्यांपूर्वी बांधकाम देखील सुरू केले असून, कंपाउंड वॉलच्या बांधकामासह काही मशिनरीही आणण्यात आली. तसेच हा प्रकल्प 118 एकर जमिनीवर साकारला जाणार होता. यातून शेकडो कोटींची (2500 कोटी) गुंतवणूक होणार असून मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्मिती होणार होती.

आतापर्यंत कंपनीने अनेक कामे सुरू केली होती. या प्रकल्पामुळे अमरावती परिसरातील कुशल आणि अकुशल कामगारांच्या, विशेषत: फार्मा क्षेत्राशी निगडित तरुणांच्या रोजगारासाठीच्या आशा वाढल्या होत्या. मात्र कंपनीने अचानक कामकाज बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.

हा औद्योगिक प्रकल्प उभारण्यासाठी अमरावतीच्या नांदगाव पेठ एमआयडीसीने जमीन दिल्यानंतरही अनेक वर्षे काहीही न झाल्यामुळे स्थानिक शेतकऱ्यांनी त्यावर शेती सुरूच ठेवली. जेव्हा काम सुरू झाले तेव्हा कंपनीच्या लोकांनी यावर आक्षेप घेतल्यास शेतकरी आणि कंपनीत वादा झाले.

माहुली जहांगीर पोलीस ठाण्यात अशाच वादाची तक्रार ही दाखल झाली. त्यानंतर पोलीस बंदोबस्तात काही दिवस काम सुरू होते तरीही हरमन कंपनी अमरावतीतून निघून गेल्याचे सांगण्यात येत आहे.

दरम्यान, स्थानिक समस्यांमुळे अमरावतीतून हि मोठी गुंतवणूक निघून गेल्याचे सांगण्यात येत आहे. याठिकाणी शेतकरी आणि इतर काही लोक कंपनीच्या अधिकाऱ्यांना सतत त्रास देत असल्याचे वृत्त आहे.

या विषयी राजकीय नेत्यांनी कंपनीशी पुन्हा काम सुरू करण्यासंदर्भात चर्चा केली पण कंपनी काम करण्यास उत्सुक दिसत नाही.

 


दिवसभरातील ताज्या आणि महत्त्वाच्या घडामोडी :  www.mahanayakonline.com

दिवसभरातील ताज्या News Update | Join with Mahanayak Online :

https://chat.whatsapp.com/KHZm2husxzD6XiBY0eBBnZ

MahanayakOnline
www.mahanayakonline.com

For advertising call now :
9421379055 | 9028150765

आपलं सरकार

Click to listen highlighted text!