Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

MaharashtraNewsUpdate : आरक्षणावरून सुरू असलेला धुमाकूळ चांगली बाब नाही : नाना पटोले

Spread the love

नागपूर : ओबीसी आणि मराठा समाजात राज्य सरकारने भांडण लावले आहे आहे. ते आता टोकाला गेले असून आरक्षणावरून सुरू असलेला धुमाकूळ थांबवण्यात यावा अशी मागणी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली.

जरांगे आणि भुजबळ काय म्हणतात त्यावर आम्हाला बोलायचे नाही. दोन्ही समाजाला न्याय कसा देता येईल हे सरकारने ठरवावे. दोघांचे भांडण आता वैयक्तिक स्तरावर आले आहे. एकमेकांच्या समाजवर टीकाटीपणी केली जात आहे. ही  महाराष्ट्रासाठी चांगली बाब नाही. कोणी सरकार पुरस्कृत बोलत असेल तर ते चुकीचे आहे. याबाबत काँग्रेसची भूमिका स्पष्ट व सुसंगत आहे.

काँग्रेसने सत्तेवर आल्यास जातिनिहाय जनगणना करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे सर्व समाजाला न्याय मिळेल. लोकसंख्येनुसार ओबीसींच्या आरक्षणात वाढ होईल आणि मराठा समाजाचा प्रश्नही सुटेल असाही दावा पटोले यांनी केला.

पंतप्रधान नरेंद्र मोदी शक्तीशाली नेते आहे. मात्र पनोती हा शब्द त्यांनी स्वतःला का लावून घेतला हे समजत नाही. त्यामुळे पनोती शब्द ट्रेडिंग झाला आहे. सर्वसामान्य लोक त्याचा वापर करीत आहे. काँग्रेसने मोदी यांच्याबद्धल हा शब्द वापरला नाही. मात्र भाजपच्या कार्यकर्त्यांनीच तसा समज करून घेतला असेही पटोले म्हणाले.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!