Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

CrimeNewsUpdate : पत्नीच्या मारहाणीत पती झाला गतप्राण , बुक्क्यांनी घेतला जीव .. !!

Advertisements
Advertisements
Spread the love

पुणे : महाराष्ट्रातील पुण्यातून एक खळबळजनक घटना समोर आली आहे. येथे एका पत्नीने पतीला तिच्या वाढदिवसाला दुबईला नेले नाही म्हणून लथा बुक्क्यांनी मारहाण करीत अक्षरशा: जीव घेतला.  पुण्यातील वानवडी भागातील एका पॉश रहिवासी सोसायटीत असलेल्या दाम्पत्याच्या अपार्टमेंटमध्ये शुक्रवारी ही घटना घडली.

निखिल खन्ना (३६) असे मृताचे नाव असून, ते बांधकाम उद्योगाचे व्यावसायिक आहेत. निखिल खन्ना यांचा रेणुका (३८) सोबत ६ वर्षांपूर्वी प्रेमविवाह झाला होता.

Advertisements

पोलिसांच्या माहितीनुसार तिला तिच्या वाढदिवसाला  दुबई टुरचे गिफ्ट हवे होते. पण तिच्या पतीला तिची इच्छा पूर्ण करता न आल्याने या महिलेने भांडण सुरू केलेआणि त्याचे पर्यवसान हाणामारीत झाले. या मारहाणीत गंभीर जखमी झाल्याने पतीचे निधन झाले. घटनेची माहिती मिळताच वानवडी पोलिसांनी घटनास्थळ गाठून आरोपी पत्नी रेणुकाला अटक केली.

Advertisements
Advertisements

पोलीस काय म्हणाले ?

वानवडी पोलीस ठाण्यात तैनात असलेल्या एका पोलीस अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, ही घटना शुक्रवारी दुपारी घडली. निखिलने रेणुकाला तिचा वाढदिवस साजरा करण्यासाठी दुबईला नेले नाही आणि तिला महागडे गिफ्ट दिले नाही यावरून दोघांमध्ये भांडण झाले. तसेच एका नातेवाईकाचा वाढदिवस साजरा करण्यासाठी त्याने तिला दिल्लीला जाऊ दिले नसल्याचा रागही  निखिलवर होता.

नवरा बेशुद्ध झाला होता…

पोलिसांनी पुढे सांगितले की, “मारामारीदरम्यान रेणुकाने निखिलच्या तोंडावर ठोसा मारला.” हा ठोसा एवढा जोरदार होता की निखिलचे नाक आणि काही दात तुटले. जास्त रक्तस्त्राव झाल्याने निखिल बेशुद्ध झाला होता. पोलिसांनी रेणुकाविरुद्ध गुन्हा दाखल करून तिला अटक केली आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!