Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

MarathaReservationUpdate : मराठ्यांना मराठा म्हणूनच आरक्षण द्या , मराठा क्रांती मोर्चाची मुख्यमंत्र्यांच्या वर्ष बंगल्यावर धडक, आंदोलकांची धरपकड …

Spread the love

मुंबई : एकीकडे मराठवाड्यात मराठा समाजाला कुणबी प्रवर्गातून सरसकट आरक्षण देण्यात यावे या मागणीसाठी मनोज जारांगे यांचे आंदोलन सुरु असताना , दुसरीकडे मुंबईत मराठा क्रांती मोर्चाचा वतीने मराठा आरक्षणासाठी आंदोलन केलं जाणार असल्याचा एक मेसेज सोशल मीडियावर व्हायरल झाला आणि गिरगाव चौपाटीपासून मोर्चाला सुरुवात झाली. हा मोर्चा मुंख्यमंत्र्यांचं शासकीय निवासस्थान असलेल्या वर्षा बंगल्याच्या दिशेनं कूच करत असून या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांच्या वर्षा बंगल्यावरही कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. तर या भागात आंदोलकांची धरपकड सुरु आहे.

या मोर्चाच्या आधी सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या एका मेसेजनं मुंबई पोलिसांची चिंता वाढवली होती पण या व्हायरल मेसेजची पुष्टी होत नव्हती. अखेर मॅसेजप्रमाणे मराठा क्रांती मोर्चा महाराष्ट्र तर्फे आज मुंबईत धडक मोर्चा काढण्यात आला आहे. मोर्चाला सुरुवात झाली असून मोर्चानं थेट मुख्यमंत्र्यांचं शासकीय निवासस्थान असलेल्या वर्षा बंगल्याच्या दिशेनं हा मोर्चा जात आहे. सावधगिरीचा उपाय म्हणून त्यादरम्यानच्या रस्त्यांवरील वाहतूक बंद करण्यात आली आहे.

मराठा क्रांती मोर्चाच्या मागण्या काय?

आरक्षण हे मराठा म्हणूनच पाहिजे आणि महत्त्वाचं म्हणजे, कायद्यात टिकणारं पाहिजे या मागण्यांसाठी मराठा क्रांती मोर्चाकडून हे आंदोलन केलं जात असल्याचं आंदोलकांनी सांगितलं आहे. दुसरीकडे काही दिवसांपूर्वी मनोज जरांगे यांनी मराठा समाजाच्या आरक्षणासाठी अंतरवाली सराटी जालना येथे आमरण उपोषण करून सरसकट मराठ्यांना कुणबीमधून आरक्षण द्या अशी मागणी केली आहे. पण आता मराठा क्रांती मोर्चानं मराठ्यांना मराठा म्हणूनच आरक्षण द्या, अशा मागणीसाठी आंदोलन छेडलं असून त्यासाठी हा मोर्चा काढण्यात आला आहे.

मराठा आंदोलकांची धरपकड

गिरगावात मराठा क्रांती मोर्चाचे आंदोलक एकत्र जमले आणि त्यांनी मुख्यमंत्र्यांचं शासकीय निवासस्थान असलेल्या वर्षा बंगल्याकडे कूच करत असताना , गिरगाव चौपाटी ते वर्षा बंगला दरम्यानचा परिसर सायलेंट झोन असून पोलिसांनी या मोर्चाला परवानगी नाकारली होती. मात्र, आंदोलकांशी चर्चेनंतर पोलिसांनी गिरगाव येथील शहीद तुकाराम ओंबळे चौक ते विविंग डेकपर्यंत मोर्चासाठी परवानगी दिली. आंदोलकांनी आपला मोर्चा सुरू केला. विविंग डेक परिसरात मोर्चा आल्यानंतर पोलिसांनी मराठा आंदोलकांना ताब्यात घेण्यात आले आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!