Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

Israel-Palestine Conflict : मोठी बातमी : तेल अवीव, इस्रायल येथून एअर इंडियाची उड्डाणे १४ ऑक्टोबरपर्यंत स्थगित

Spread the love

नवी दिल्ली : इस्रायल आणि पॅलेस्टाईन यांच्यात सुरू असलेल्या युद्धादरम्यान एअर इंडियाने इस्रायलहून आपली उड्डाणे रद्द केली आहेत. एअर इंडियाच्या प्रवक्त्याने सांगितले की, आमचे प्रवासी आणि कर्मचारी यांच्या सुरक्षेसाठी, तेल अवीव, इस्रायल येथून एअर इंडियाची उड्डाणे १४ ऑक्टोबरपर्यंत स्थगित राहतील.

या कालावधीत, ज्या लोकांनी निश्चित बुकिंग केले आहे त्यांना सर्व शक्य मदत दिली जाईल. एअर इंडिया दर आठवड्याला तेल अवीवसाठी 5 उड्डाणे चालवते. याआधी शनिवारीही, फ्लाइट क्रमांक AI 139 आणि परतीचे फ्लाइट AI 140 नवी दिल्ली ते तेल अवीव रद्द करण्यात आले होते.

हमासने इस्रायलवर हल्ला केला

शनिवारी (7 ऑक्टोबर) हमासने इस्रायलवर हल्ला केला. तेव्हापासून दोन्ही पक्षांमध्ये युद्ध सुरू आहे. या युद्धात आतापर्यंत इस्रायलमध्ये सुमारे 300 लोकांचा मृत्यू झाला असून सुमारे 1590 लोक जखमी झाले आहेत. त्याच वेळी, गाझामध्ये 232 लोकांचा मृत्यू झाला आणि 1790 लोक जखमी झाले. गाझामध्ये उपस्थित पॅलेस्टिनी आरोग्य मंत्रालयाने म्हटले आहे की गेल्या 24 तासांत 256 पॅलेस्टिनी नागरिकांचा मृत्यू झाला असून त्यात 20 मुलांचा समावेश आहे. याशिवाय 1788 पॅलेस्टिनीही जखमी झाले आहेत.

इस्रायली सैन्याने प्रत्युत्तर दिले

इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी हमासच्या हल्ल्याबाबत युद्ध घोषित केले आणि शत्रूंना याची मोठी किंमत चुकवावी लागेल, असे सांगितले. इस्रायली लष्कराच्या म्हणण्यानुसार, हमासच्या अतिरेक्यांनी गाझा पट्टीतून 2 हजारांहून अधिक रॉकेट डागले. प्रत्युत्तरादाखल लष्कराने गाझा शहराच्या मध्यभागी असलेला एक टॉवर पाडला. हवाई आणि सागरी सीमेवर 7 ठिकाणांहून हमासने घुसखोरी केल्याचे इस्रायली लष्कराने सांगितले.

‘आयडीएफला गाझा पट्टीवर नियंत्रण मिळवायचे आहे’

दरम्यान, इस्रायल डिफेन्स फोर्सेसने (आयडीएफ) गाझा पट्टीवर ताबा मिळवायचा असल्याचे सांगितले. आयडीएफचे प्रवक्ते लेफ्टनंट कर्नल रिचर्ड हेच यांनी सांगितले की, गाझा पट्टीवर नियंत्रण मिळवणे हा आमचा उद्देश आहे. आमचे पुढील १२ तासांचे लक्ष्य आहे. आम्हाला संपूर्ण क्षेत्रावर नियंत्रण मिळवायचे आहे आणि अतिरेक्यांना मारायचे आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!