Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

MarathwadaNewsUpdate : भाजप नेत्या पंकजा मुंडे यांच्या कारखान्यावर मालमत्ता जापतीची करवाई

Spread the love

छत्रपती संभाजीनगर : भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे यांच्या परळीतील वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्यावर केंद्रीय जीएसटी आयुक्तालयाने मोठी कारवाई केली आहे. केंद्रीय जीएसटी आयुक्तालयाकडून कारखान्याची 19 कोटी रुपयांची मालमत्ता जप्त करण्यात आली आहे. जीएसटी विभागाने एप्रिल महिन्यातही कारखान्यावर छापेमारीची कारवाई केली होती. आता पुन्हा एकदा कारवाई झाल्याने चर्चेला उधाण आलं आहे.

भाजप नेत्या पंकजा मुंडे यांच्या परळी येथील वैद्यनाथ सहकारी कारखान्यावर केंद्रीय जीएसटी आयुक्तालयाने 6 महिन्यांपूर्वी छापेमारी करून काही कागदपत्रे तपासले होते. यामध्ये या कारखान्याने 19 कोटी रुपयांचा बेकायदेशीर जीएसटी कर बुडवल्याचे स्पष्ट झाले आहे. काल त्यानंतर औरंगाबाद येथील जीएसटी आयुक्तालयाने या कारखान्याची 19 कोटी रुपयांची मालमत्ता जप्त केली आहे. या कारखान्याच्या चेअरमन पंकजा मुंडे आहेत.

साखर कारखान्याची चौकशी सुरु होती…

दरम्यान केंद्र सरकारचा जीएसटी थकवल्याप्रकरणी वैद्यनाथ साखर कारखान्याची चौकशी सुरु होती. वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्याला शनिवारी यासंदर्भात नोटीस बजावण्यात आलेली होती. तर कारखान्यातील कोणती मालमत्ता जप्त केली आहे याची माहिती असलेले एक पत्रक जीएसटी विभागाकडून कारखान्याच्या गेटवर लावण्यात आले आहे. लावलेल्या पत्रकानुसार कारखान्याचे बॉयलर हाऊस आणि इतर मशनरी जप्त करण्यात आल्याची माहिती आहे. त्याचबरोबर जप्त केलेल्या या मशिनरीचा लिलाव करुन कर वसूल करणार असल्याचे देखील जीएसटी विभागाने म्हंटले आहे.

युनियन बँकेचे कारखान्यावर 1200 कोटी रुपयांचे कर्ज

केंद्रीय जीएसटी आयोगाचे औरंगाबाद येथील आयुक्त कार्यालयाच्या पथकाने वारंवार वैद्यनाथ कारखान्याला जीएसटी कराबाबत नोटीसा दिल्या होत्या. या नोटिशीला प्रत्युत्तर न दिल्याने गेल्या सहा महिन्यांपूर्वी काही अधिकार्‍यांनी या कारखान्याला अचानक भेट देत काही कागदपत्रे हस्तगत केली होती. दरम्यान, या आधीच युनियन बँकेने कारखान्याची मालमत्ता सील केली आहे. युनियन बँकेचे कारखान्यावर 1200 कोटी रुपयांचे कर्ज आहे. हे कर्ज न फेडल्याने बँकेने ही कारवाई केली आहे. बँकेची ही कारवाई ताजी असतानाच आता जीएसटी कार्यालय अधिक सक्रिय झाल्याने कारखान्याच्या अडचणी वाढल्या आहेत.

दरम्यान या कारखान्याने बेकायदेशीररित्या 19 कोटींचा जीएसटी कर बुडवल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर पोलीस बंदोबस्तात कारखान्याचे बॉयलर हाऊस आणि इतर मशिनरी असे मिळून १९ कोटींची मालमत्ता जप्त केली आहे. या मालत्तेचा लिलाव करून हा कर वसूल करण्यात येणार असल्याचे समजते.

पंकजा मुंडे यांच्या अडचणी वाढवणारी घटना

शिवशक्ती यात्रा काढल्यानंतर भाजप नेत्या पंकजा मुंडे या चांगल्याच चर्चेत आल्या होत्या. या यात्रेच्या निमित्ताने त्यांनी काही जिल्हे पिंजून काढले. अनेक धार्मिक स्थळांना भेटी दिल्या. या दरम्यान त्यांनी काही विधाने केली होती. आपल्याच पक्षाला सुनावणारी ती विधाने होती. खासकरून मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून पंकजा यांनी आपल्याच पक्षाला चांगलं घेरलं होतं. त्यांच्या या शिवशक्ती यात्रेला चांगला प्रतिसाद मिळाला होता. त्यामुळे त्या महाराष्ट्रातील राजकारणात कमबॅक करतील असं सांगितलं जात होतं. या चर्चा सुरू असतानाच पंकजा मुंडे यांच्या अडचणी वाढवणारी एक घटना घडली आहे. त्यामुळे खळबळ उडाली आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!