ParliamentNewsUpdate : बसपा खासदार दानिश अली यांना असभ्य भाषेत बोलणाऱ्या भाजप खासदाराची सर्वत्र निंदा , राहुल गांधी यांनी घेतली गळाभेट …

नवी दिल्ली : भाजपाचे खासदार रमेश बिधूडी यांच्या विधानाने वाद चिघळला आहे. खासदार रमेश बिधूडी यांनी संसदेत चर्चेदरम्यान केलेल्या वादग्रस्त विधानवरून मोठी टीका होत असून त्याचा निषेध करण्यात येत आहे . सरकारने कारवाई म्हणून के केले तर त्याचे विधान लोकसभेच्या कामकाजाच्या रेकॉर्डमधून हटवण्यात आले आहे. जेंव्हा की , देशभर संबंधित खासदाराने जी मुक्ताफळे उधळली ती ऐकली आहेत . लोकांचा विरोध लक्षात घेता भाजपाने खासदार रमेश बिधूडी यांना कारणे दाखवा नोटीस बजावली. याआधीही लोकसभा अध्यक्षांनी नाराजी व्यक्त करत त्यांच्या वर्तनावर कठोर कारवाईचा इशारा दिला होता.
काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी शुक्रवारी बसपा खासदार दानिश अली यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. या दरम्यान काँग्रेस नेत्याने दानिश अली यांची गळाभेट घेतली. या बैठकीचा फोटो राहुल गांधींनी X वर शेअर केला आहे. राहुल गांधींनी X वर पोस्ट करत लिहिले की, द्वेषाच्या बाजारात प्रेमाचे दुकान. राहुल गांधी यांची भेट घेतल्यानंतर बसपा खासदार दानिश अली म्हणाले की, “माझे मनोबल वाढवण्यासाठी आणि पाठिंबा देण्यासाठी ते येथे आले आहेत.” ते म्हणाले की, मी एकटा नाही आणि जे लोक लोकशाहीच्या पाठीशी उभे आहेत ते सर्व माझ्यासोबत उभे आहेत.” त्यांच्यासोबत काँग्रेस खासदार केसी वेणुगोपालही उपस्थित होते.
काँग्रेसने भाजपवर निशाणा साधला
दोन्ही नेत्यांच्या भेटीवर काँग्रेसने पोस्ट टाकली आणि भाजपचे दोन माजी मंत्री अश्लील हसत राहिले. काँग्रेसने पुढे लिहिले की, “रमेश बिधुरी यांची ही लाजिरवाणी आणि क्षुद्र कृती सभागृहाच्या प्रतिष्ठेवर डाग आहे. संपूर्ण देशासह काँग्रेस लोकशाहीच्या मंदिरात द्वेष आणि द्वेषाच्या अशा मानसिकतेच्या विरोधात आहे.”
नफ़रत के बाज़ार में मोहब्बत की दुकान pic.twitter.com/3IqLMFU0dx
— Rahul Gandhi (@RahulGandhi) September 22, 2023
रमेश बिधुरी यांनी लोकसभेत आक्षेपार्ह वक्तव्य केले होते
गुरुवारी संसदेच्या विशेष अधिवेशनादरम्यान भाजप खासदार रमेश बिधुरी यांनी लोकसभेत बसपा खासदार दानिश अली यांच्यावर आक्षेपार्ह टिप्पणी केली होती. विरोधी पक्षांनी रमेश बिधुरी यांच्या वक्तव्याचा निषेध केला असून त्यांच्यावर कठोर कारवाईची मागणी लोकसभा अध्यक्षांकडे केली आहे.
भाजपने कारणे दाखवा नोटीस बजावली
भाजपचे ज्येष्ठ नेते आणि संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनीही रमेश बिधुरी यांच्या वक्तव्यावर माफी मागितली आहे. तसेच भाजपने रमेश बिधुरी यांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. पीटीआय या वृत्तसंस्थेने दिलेल्या वृत्तानुसार, भाजप नेतृत्वाने त्यांची टिप्पणी गांभीर्याने घेतली आहे.
आदित्य ठाकरेंची टीका
आदित्य ठाकरेंनी सोशल मीडियावर एक पोस्ट करत म्हटले, “सत्य हे आहे की, हे फक्त भाषेबद्दल नाही, ही वृत्ती आहे. आज ते एका धर्मासाठी बोलले आहेत, उद्या ते कोणत्याही राजकीय विरोधकांसाठी बोलतील. ते आमच्या देशासाठी किंवा माझ्या धर्मासाठी बोलत नाहीत, ते त्यांच्या राजकीय मानसिकतेसाठी बोलत आहेत.” आपल्या लोकशाहीच्या मंदिरात एखाद्या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करणार्या व्यक्तीकडून अशा घाणेरड्या वर्तनासाठी केवळ इशारा दिला जातो, ही खरोखरच लाजिरवाणी गोष्ट असल्याचे ठाकरेंनी सांगितले. तसेच सरकारच्या विरोधात बोलणारा विरोधी सदस्य असता तर त्या सदस्याला निलंबित केले असते, आणि बरेच काही, अशा शब्दांत आदित्य ठाकरेंनी भाजपावर निशाणा साधला.