Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

IndiaNewsUpdate : तू ब्राह्मण आहेस तर मी काय बसोर आहे का ? बागेश्वर धामच्या धीरेंद्रकृष्ण शास्त्रीवर गुन्हा दाखल

Spread the love

नवी दिल्ली : परचा प्रकरणावरुन देशभर प्रसिद्ध झालेले बागेश्वर धामचे धीरेंद्रकृष्ण शास्त्री आपल्या वक्तव्यामुळे अडचणीत येण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत. त्यांच्यावर बसोर या अनुसूचित जातीत येणाऱ्या जात समूहाचा अपमान केल्याचा आरोप आहे. त्यानंतर आता बसोर समाजाकडून अनुसूचित जाती आणि जनजाती अधिनियमांतर्गत पोलिसात तक्रार करण्यात आली असून पोलिसांनी तक्रारीच्या आधारे तपास सुरु केला आहे. दरम्यान या समाजाने बौद्ध धम्म स्वीकारण्याचा इशाराही दिला आहे.

https://twitter.com/OmnarayanDhanuk/status/1700405999373623332?

नेमके काय झाले ?

बागेश्वर धामचे पंडित धीरेंद्रशास्त्री या त्यांच्या दिव्य दरबारात आलेल्या एका तरुणासोबत बोलत होते. बाबा बागेश्वर यांनी काढलेल्या एका चिठ्ठीवर या युवकाने आक्षेप घेतला. त्यावर बाबा बागेश्वर भडकले. त्यानंतर त्यांनी युवकाला आव्हान दिलं. त्यावेळी युवक म्हणाला की मी ब्राह्मण आहे. त्यावेळी बाबा म्हणाले मग मी काय बसोर आहे का? यानंतर हा युवक आणि बाबा यांच्यात बराच वाद झाला. धीरेंद्रशास्त्रींनी २ सप्टेंबरला हे वक्तव्य केले होते. त्यानंतर हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. हा व्हिडीओ समाजमाध्यमांवर व्हायरल झाल्यानंतर छतरपूरच्या बसोर समाजाने पोलीस ठाण्यात धीरेंद्रशास्त्रींच्या विरोधात तक्रार नोंदवली आहे.

राजस्थानातल्या सीकरमधल्या मंचावरून बागेश्वर बाबांनी आमच्या समाजाचा अपमान केला असा आरोप आता बसोर समाजाने केला आहे. धीरेंद्रशास्त्रींविरोधात गुन्हा दाखल झाला नाही तर देशभरात आंदोलन करू आणि बसोर समाज सोडून बौद्ध धर्म स्वीकारू असा इशाराही देण्यात आला आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!