IndiaNewsUpdate : हिंदू धर्म जगासाठीही धोका , भारतीय हिंदू विदेशातही लोकांमध्ये फूट पडताहेत : खा . ए. राजा यांचे वक्तव्य
चेन्नई : जात आणि धर्माच्या आधारे लोकांमध्ये फूट पाडण्याच्या जागतिक रोगाचं कारण भारत आहे. जगातील इतर ठिकाणी राहत असलेले भारतीय नागरिक देखील हिंदू धर्माच्या नावाने जातियवादाचा प्रचार-प्रसार करत आहेत. त्यामुळे हिंदू धर्म हा केवळ भारतासाठीच नाही, तर संपूर्ण जगासाठी एक मोठा धोका असल्याचे विधान डिएमकेचे खा. ए राजा यांनी केले असल्याची माहिती भाजपचे प्रदेशाध्यक्ष के . अन्नामलाई यांनी आपल्या ट्विटर हँडलवरुन दिली आहे.
हा व्हिडीओ पोस्ट करताना त्यांनी , द्रमुक हे तामिळनाडूमध्ये मोठ्या प्रमाणात जातियवाद पसरवत असल्याचा आरोप केला. तसंच, स्वतःच अशा गोष्टी पसरवून, द्रमुक खासदार सनातन धर्माला दोष देत असल्याचंही या पोस्टमध्ये म्हटलं आहे. अन्नामलाई यांनी पोस्ट केलेल्या व्हिडिओमध्ये ए. राजा एका ऑनलाईन चर्चासत्रात हे वक्तव्य करताना दिसत आहेत.
या आधी काय म्हटले होते ?
यापूर्वी तामिळनाडूचे युवक कल्याण आणि क्रीडा मंत्री उदयानिधी स्टॅलिन यांनी सनातन धर्म हा मलेरिया आणि डेंग्यू असल्याचं म्हटलं होतं. तर, द्रमुकचे ए. राजा यांनी स्टॅलिन यांनी अगदीच नरम तुलना केल्याचं म्हणत, सनातनची तुलना एचआयव्ही रोगाशी करायला हवी, असं वक्तव्य केलं होतं.
यावर देशभरातून वेगवेगळ्या प्रतिक्रिया येत आहेत. भाजपकडून या मुद्द्यावरुन द्रमुकवर मोठ्या प्रमाणात टीका केली जात आहे. यातच आता भाजप नेत्याने ए. राजा यांचा व्हिडिओ पोस्ट केल्यामुळे हा वाद पुन्हा नव्याने सुरू झाला आहे.