Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

IndiaNewsUpdate : सनातन धर्म हा सामाजिक न्याय आणि समतेच्या विरोधात, त्याला संपवलेच पाहिजे : उदयनिधी स्टॅलिन

Spread the love

चेन्नई : “सनातन धर्म हा सामाजिक न्याय आणि समतेच्या विरोधात आहे. काही गोष्टींचा विरोध करता येत नाही. त्या संपवल्याच पाहिजेत. आपण डेंग्यू, मलेरिया किंवा कोरोनाचा विरोध करू शकत नाही त्याला संपवलेच पाहिजे. तसेच, सनातन धर्मालाही संपवायचे आहे.” असे उद्गार तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम.के स्टॅलिन यांचे सुपूत्र क्रीडा मंत्री उदयनिधी स्टॅलिन यांनी एका काययटक्रमात बोलताना काढले असून त्यांच्या या विधानानंतर उदयनिधी स्टॅलिन यांच्यावर भाजपाकडून टीका करण्यात येत आहे. तर, उदयनिधी स्टॅलिन आपल्या वक्तव्यावर ठाम आहेत.

यावर भाजपाचे नेते अमित मालवीय यांनी ट्वीट करत उदयनिधी स्टॅलिन यांना लक्ष्य केलं. “मुख्यमंत्री एम.के स्टॅलिन यांचे पुत्र आणि द्रमुक सरकारमधील मंत्री उदयनिधी स्टॅलिन यांनी सनातन धर्माची तुलना डेंग्यू आणि मलेरियाशी केली आहे. सनातन धर्माला फक्त विरोध न करता तो संपवला पाहिजे, असं स्टॅलिन यांचं मत आहे. थोडक्यात सनातन धर्म मानणाऱ्या देशातील ८० टक्के लोकसंख्येला संपवण्याची ते भाषा करत आहेत.”

“द्रमुक हा विरोधी पक्षातील प्रमुख तर काँग्रेसचा सहकारी पक्ष आहे. स्टॅलिन यांच्या वक्तव्यावर मुंबईतील बैठकीत एकमत झालं होतं होतं का?” असा सवाल अमित मालवीय यांनी विचारला आहे. तर यावर प्रत्युत्तर देत उदयनिधी स्टॅलिन यांनी विधानावर ठाम असल्याचं सांगितलं आहे. उदयनिधी स्टॅलिन यांनी म्हटलं, “सनातन धर्माला मानणाऱ्यांना संपवण्याची भाषा मी केली नाही. माझ्या वक्तव्याबाबत कोणत्याही कायदेशीर गोष्टींना सामोरं जाण्यासाठी मी तयार आहे.”

काँग्रेस खासदारांनी उदयनिधींना पाठिंबा दिला

काँग्रेस खासदार कार्ती चिदंबरम यांनीही उदयनिधी यांच्या वक्तव्यावरून वादात सामील झाले आहेत. सनातन धर्म ही जातिवर्गीय समाजाची संहिता नसून दुसरे काही नाही या उदयनिधी यांच्या विधानाचे त्यांनी समर्थन केले आहे. यासाठी फलंदाजीला जाणारे सर्वजण चांगल्या जुन्या दिवसांची आस बाळगून आहेत! जात हा भारताचा शाप आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!