MaharashtraPoliticalUpdaate : ‘त्या’ आमदारांना खुलासा करण्यासाठी दोन आठवड्याची मुदतवाढ …

मुंबई : शिंदे गटातील आमदारांना अपात्रतेचा मुद्यावर खुलासा करण्यासाठी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी मुदतवाढ दिली आहे.त्यामुळे शिवसेनेच्या ४० बंडखोर आमदारांना मुदतवाढ मिळाली आहे. दोन आठवड्यांची मुदत वाढीव आमदारांना मिळाली आहे. मात्र या आमदारांना खुलासा किंवा उत्तर देण्यासाठी ही शेवटची संधी आहे.
पावसाळी अधिवेशनानंतर सुनावणीस होणार सुरुवात होणार आहे. नोटीसीचा खुलासा दिलेल्या आमदारांना पुरावे सादर करावे लागणार आहेत. विधीमंडळातील खात्रीलायक सुत्रांनी साम टीव्हीला ही माहिती दिली आहे . विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर जुलै २०२२२ मध्ये कोणत्या पक्षाला व्हिप नेमण्याचा अधिकार आहे या मुद्द्यावर अंतिम निर्णय घेण्यासाठी उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांची भेट घेऊ शकतात.
राहुल नार्वेकर यांनी सोमवारी आढावा बैठक घेतला आणि अधिकाऱ्यांना त्यांच्या अपात्रतेच्या याचिकांवर सुनावणी सुरू होण्यापूर्वी शिंदे यांच्या नेतृत्वाखालील ४० शिवसेना आमदार आणि उद्धव ठाकरे गटातील १४ आमदारांना उत्तर दाखल करण्यास सांगितले. मात्र आता शिंदे गटातील आमदारांना २ आठवड्यांची मुदतवाढ मिळाली आहे.
दरम्यान याबाबत बोलताना ठाकरे गटाचे आमदार अनिल परब म्हणाले, राहुल नार्वेकर यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह १६ आमदारांना अपात्र ठरवावे लागेल, ज्यांनी गेल्या वर्षी जूनमध्ये पक्षनेतृत्वाविरुद्ध बंड केले होते. “काय कायदेशीर आणि काय बेकायदेशीर, कोण पात्र आणि कोण अपात्र याबाबत सर्वोच्च न्यायालयाने मार्गदर्शक तत्त्वे दिली आहेत. सभापतींना १६ आमदारांना अपात्र ठरवावे लागेल आणि त्यांनाही हे चांगले माहीत आहे,” असे परब म्हणाले.