IndiaNewsUpdate : देशात आयकर भरणाऱ्यांच्या संख्येत मोठी वाढ , जाणून घ्या किती कोटी लोकांनी भरले आय टी रिटर्न ?

नवी दिल्ली : देशात आयकर भरण्याची वेळ सुरू आहे आणि 31 जुलै 2023 ही ITR दाखल करण्याची अंतिम तारीख आहे. प्राप्तिकर विभाग करदात्यांना 31 जुलै 2023 पर्यंत आयटीआर दाखल करण्याची वारंवार आठवण करून देत आहे. या वर्षीचे आयटीआर दाखल करण्याचे आकडे उत्साहवर्धक असले तरी प्राप्तिकर विभागाने याबाबत ट्विट करून माहिती दिली आहे.
प्राप्तिकर विभागाने आज एका ट्विटद्वारे म्हटले आहे की, ‘आम्हाला हे कळविण्यात आनंद होत आहे की, आजपर्यंत (11 जुलै) 2023-24 च्या मूल्यांकन वर्षासाठी एकूण 2 कोटीहून अधिक आयकर रिटर्न भरले गेले आहेत. गेल्या वर्षीची तुलना केल्यास, 20 जुलै 2022 पर्यंत 2 कोटी आयटीआर दाखल करता आले. आमच्या करदात्यांनी 9 दिवसांपूर्वी हा 2 कोटींचा टप्पा गाठण्यासाठी आम्हाला मदत केली आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत हा आकडा चांगला असून आम्ही करदात्यांच्या प्रयत्नांचे कौतुक करतो. आयकर विभागाने असेही म्हटले आहे की ज्यांनी मूल्यांकन वर्ष 2023-24 साठी त्यांचे आयटीआर दाखल केले नाही त्यांना आम्ही ते लवकरात लवकर दाखल करण्याचे आवाहन करतो जेणेकरून शेवटच्या क्षणी होणारी गर्दी टाळता येईल.
We are happy to inform that over 2 crore Income Tax Returns (ITRs) for AY 2023-24 have already been filed till 11th of July this year as compared to 2 crore ITRs filed till 20th of July last year.
Our taxpayers have helped us reach the 2 crore milestone 9 days early this year,… pic.twitter.com/ZlOAKeJpWR
— Income Tax India (@IncomeTaxIndia) July 11, 2023
२६ जूनपर्यंत १ कोटी आयटीआर भरले गेले…
प्राप्तिकर विभागाने यापूर्वीही ट्विटद्वारे 1 कोटी आयटीआर फाईल्सची माहिती दिली होती. प्राप्तिकर विभागाने सांगितले होते की 26 जून 2023 पर्यंत एक कोटी करदात्यांनी आयकर रिटर्न भरले आहेत. शेवटच्या मूल्यांकन वर्ष 2022-23 मध्ये, 8 जुलै 2023 पर्यंत एक कोटी करदात्यांनी आयकर रिटर्न भरले होते. मूल्यांकन वर्ष 2023-24 साठी आयकर रिटर्न भरण्याची अंतिम तारीख 31 जुलै 2023 आहे. फॉर्म-1 द्वारे आयकर भरणाऱ्या बहुतांश करदात्यांच्यासाठी ही शेवटची तारीख आहे.