MaharashtraPoliticalDramaUpdate : भाजपने राष्ट्रवादीला भ्रष्टाचाराच्या आरोपातून मुक्त केले, शरद पवार यांनी मानले मोदींचे आभार , राजकीय नाट्यावर कोण काय म्हणाले ?

https://www.youtube.com/watch?v=mUQUbJz_Jxc
मुंबई : कुणी पक्षावर दावा केला तरी आम्ही लोकांमध्ये जाणार आहे. आमची खरी शक्ती सामान्य माणूस आणि कार्यकर्ते आहेत, असे शरद पवार म्हणाले. यावेळी बोलताना शरद पवार यांनी भाजपवर निशाणा साधला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रवादी काँग्रेसवर भ्रष्टाचाराचा आरोप केला होता. त्याच राष्ट्रवादीच्या नेत्यांना मंत्री केले. भाजपने राष्ट्रवादीला भ्रष्टाचाराच्या आरोपातून मुक्त केले, असे शरद पवार म्हणाले. ईडीच्या चौकशीमुळे काही आमदार अस्वस्थ होते. मोदींच्या वक्तव्यानंतर त्यांची अस्वस्थता आणखी वाढली.
देशातील सर्व महत्वाच्या नेत्यांचे फोन आले. उद्धव ठाकरे यांच्याशीही फोनवर चर्चा झाली. शपथविधी समारंभात अनेकांचे चेहरे चिंताजनक होते. पक्ष फुटला असे मी कधीच म्हणणार नाही. आम्ही न्यायालयात जाणार नाही, जनतेत जाणार आहोत. तटकरे, प्रफुल्ल पटेल यांच्यावर कारवाई करणार. राष्ट्रवादी सोडून गेलेल्या नेत्यांच्या राजकीय भविष्याची काळजी. महाविकास आघाडी एकत्र काम करणार . आता थांबणे नाही, राज्य आणि देश पिंजून काढेन असे पवार म्हणाले.
जे घडले त्याची चिंता नाही.
विरोधीपक्ष नेतेपदाचा राजीनामा दिल्याचे आता समजले, असे शरद पवार म्हणाले. राष्ट्रवादीचे बडे नेते सोडून गेले याची चिंता नाही, त्यांच्या राजकीय भविष्याची चिंता वाटते. अजित पवार यांच्यासोबत गेलेले काही सहकारी संपर्कात आहेत, असेही शरद पवारांनी यावेळी सांगितले. तसेच आजचा प्रकार माझ्यासाठी नवा नाही. जे घडले त्यामुळे मी चिंतेत नाही. याआधीही 1980 असा प्रकार घडला होता. मी फक्त काही जणांचाच नेता होतो. पक्ष पुन्हा बांधला होता. त्यावेळी पक्ष सोडून गेलेले सर्व पराभूत झाले होते, राज्यातील मतदारांवर माझा विश्वास आहे, असे म्हणत पुन्हा पक्ष बांधणार असल्याचे शरद पवार यांनी सांगितले.
मला हे नवीन नाही
हा आजचा प्रकार इतरांना नवीन असेल, मला हा नवीन नाही. 1986 साली निवडणुकीनंतर पक्षांचं नेतृत्व करत होतो. त्यावेळी 58 आमदार निवडून आले होते. त्यावेळी 6 सोडले तर सगळे मला सोडून गेले होते. मी त्या 58 चा विरोधी पक्षनेता होते, मी 5 लोकांचा नेता झालो. 5 लोकांना घेऊन मी पक्ष बांधायला महाराष्ट्रात बाहेर पडलो, माझा उद्देश होता की पक्ष वाढवयाचा होता. आज तितकीच संख्या आली. जे पक्ष सोडून गेले ते फरार झाले होते. 1986 नंतर पुन्हा पक्ष कसा उभा राहिल यासाठी माझा एककलमी कार्यक्रम असणार आहे.
आजचा दिवस संपला , उद्यापासून मी बाहेर
उद्या सकाळी मी बाहेर पडेन. कराडला जाऊन यशवंतरावांच्या समाधीचं दर्शन घेईन आणि उद्या दलित समाजाचा एक मेळावा आहे, त्याला मी उपस्थिती लावेन. आणि त्यानंतर राज्यात आणि देशात जेवढं जातं येईल, जेवढं फिरता येईल, जेवढा लोकांशी संपर्क वाढवता येईल, हाच कार्यक्रम करण्याचा प्रयत्न करेन. हेच धोरण आहे.
माझा महाराष्ट्राच्या जनतेवर पूर्णपणे विश्वास आहे. संयुक्त सरकार आम्ही स्थापन केलं. आज देशाच्या कानाकोपऱ्यातून अनेकांचे फोन येतायेत. आजच्या स्थितीत सगळे सांगतायेत आमची तुम्हाला साथ आहे. ममता बॅनर्जी, काँग्रेस अध्यक्ष खरगे यांचा फोन आला. अनेक नेते आणि अनेक पक्षांनी मिळून पर्यायी नेतृत्व उभं करावं. सगळ्यांची हीच भूमिका आहे. त्यामुळे जो प्रकार घडलाय त्याची मला चिंता नाही. अर्थात उद्या सकाळी मी बाहेर पडेन. कराडला जाऊन यशवंतरावांच्या समाधीचं दर्शन घेईन आणि उद्या दलित समाजाचा एक मेळावा आहे, त्याला मी उपस्थिती लावेन. आणि त्यानंतर राज्यात आणि देशात जेवढं जातं येईल, जेवढं फिरता येईल, जेवढा लोकांशी संपर्क वाढवता येईल, हाच कार्यक्रम करण्याचा प्रयत्न करेन. हीच माझी निती, असे शरद पवार यांनी सांगितले. त्यामुळे शरद पवार हे आगामी काळात अजित पवार यांच्याविरोधात दंड थोपटून मैदानात उतरण्याची शक्यता दिसत आहे.
विरोधी पक्ष नेता कोण ?
राजीनामा दिल्यानंतर विरोधी पक्षनेतेपदाची नियुक्ती करायची असेल तर हा अधिकार महाराष्ट्राच्या विधानसभेच्या अध्यक्षांचा आहे. त्यांचा निर्णय मी देऊ शकत नाही. पण पक्षप्रमुख म्हणून पुढच्या चार दिवसांत त्याचा निर्णय घेऊ, मग तो काँग्रेस पक्ष असू शकतो, तो उद्धव ठाकरेंचा शिवसेना पक्ष असू शकतो किंवा आम्ही जो म्हणतो तो राष्ट्रवादीचा असू शकतो, असं शरद पवार म्हणाले.
देश नरेंद्र मोदींच्या हातात सुरक्षित : भुजबळ
छगन भुजबळ म्हणाले की, देश नरेंद्र मोदींच्या हातात सुरक्षित आहे. आम्ही अजितदादांसोबत असून महाराष्ट्र सरकराचा तिसरा पक्ष म्हणून सामील झालो आहोत. अनेक दिवसांपासून चर्चा सुरु होती. अनेक राज्याचे प्रश्न आहेत, अशात भांडण करुन चालणार नाही. आज नाकारता येत नाही, मात्र देश मोदींच्या हाती असल्याने देशाचे नेतृत्व खंबीर आहे. विकासाच्या कामाला निर्णय घेऊन समाधान करण्याचा प्रयत्न केला आहे. ओबीसींचे अनेक प्रश्न आहेत, आत राहून अनेक प्रश्न सोडवता येणार आहे. पाटण्यात विरोधी पक्ष एकत्र आले, मात्र ते नीट आले नसल्याचे देखील म्हणाले आहेत. रस्त्यावर भांडून प्रश्न सुटणार नसून कोणी म्हटलं आमच्यावर केसेस आहेत. मात्र आमच्यातील अनेकांवर केस नसल्याचे भुजबळ म्हणाले.
लवकरच महाराष्ट्राला नवा मुख्यमंत्री मिळणार : संजय राऊत
संजय राऊत म्हणाले की, एकनाथ शिंदे फार काळ मंत्रिपदावर राहणार नाहीत. लवकरच शिंदेसह 16 आमदार अपात्र ठरतील. शिवाय हा काही राजकीय भूकंप नाही, एकीकडे मुख्यमंत्री शिंदे म्हणाले कि, एक इंजिन लावून आता तीन इंजिनाचा सरकार स्थापन झालं आहे. मात्र आता एक इंजिन लावल्याने दुसरं इंजिन आपोआप बाहेर पडणार आहे. त्यामुळे या सरकारला लोकांचा अजिबात पाठिंबा नाही. भविष्यात आम्ही सगळे एकत्र राहू, महाराष्ट्रात महाविकास आघाडी सरकार स्थापन करु असा विश्वास राऊत यांनी व्यक्त केला. एकीकडे शिंदे गटाचा मंत्रिमंडळाचा विस्तार व्हायला हवा होता, मात्र घडले भलतेच. शिंदे गटातील लोकांचे चेहरे पाहिलेत का? त्यांची वेदना लक्षात आली असल्याचे राऊत म्हणाले. काही दिवसांपूर्वी जे सामनातून बोललो होतो, ते खरे ठरले आहे. त्यामुळे लवकरच महाराष्ट्राला नवा मुख्यमंत्री मिळणार असून हे माझं भाकित नसून परफेक्शन असल्याचे राऊत म्हणाले.
आम्ही सध्या ‘वेट अँड वॉच’ च्या भूमिकेत : नाना पटोले
या सर्व घडामोडींवर काँग्रेसची भूमिका मांडताना नाना पटोले म्हणाले की , आम्ही सध्या ‘वेट अँड वॉच’ च्या भूमिकेत आहोत. भाजपनं ऑपरेशन लोटसच्या नावाखाली भ्रष्टाचार आणि भय या दोन गोष्टी दाखवून लोकांच्या विचारांशी खेळणं आणि मूळ मुद्दे बाजुला ठेवून लोकांवर अन्याय करणं हा खेळ सुरु आहे. आता पुढे काय होतंय याचं वेट अँड वॉच आम्ही करत आहोत. जयंत पाटलांशी माझं बोलणं झालंये, ते देखील काही स्पष्ट भूमिका मांडत नाहीएत. पण शरद पवारांची प्रेस झाल्यावरच नेमकं काय आहे. भाजप ऑपरेशन लोटसद्वारे लोकशाहीची गळा घोटत आहे. पण जनता हुशार आहे. जे लोकशाहीला मानत नाही हा भाजपचा खरा चेहरा जनतेसमोर आला आहे.
अजित पवार यांचा पक्षावर दावा
अजित पवार यांनी आज भाजपसोबत जाण्याचा निर्णय घेतला. राजभवनावर अजित पवार यांनी दुपारी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. अजित पवार यांच्याशिवाय आठ आमदारांनीही मंत्रिपदाची शपथ घेतली. मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर दावा केला आहे. गेल्यावर्षी एकनाथ शिंदे यांनी 40 आमदारांना सोबत घेत बंड केला होता. एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेत राज्याच्या राजकारणात खळबळ माजवली होती. या घटनेला वर्षभर झाल्यानंतर आता अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांना सोबत घेत सरकारमध्ये सामील होण्याचा निर्णय घेतला आहे. मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर दावा केला आहे. अजित पवार यांनी पत्रकार परिषदेत 2024 ची निवडणूक पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात लढवणार असल्याचे सांगितलेय. त्याशिवाय आम्ही शिवसेनेसोबत जाऊ शकतो तर भाजपसोबत का नाही ? असेही अजित पवार म्हणाले.
अजित पवार यांच्याबरोबर कोण कोण ?
अजित पवार यांच्यासोबत छगन भुजबळ, दिलीप वळसे पाटील, हसन मुश्रीफ, धनंजय मुंडे, धर्मराव अत्राम, आदिती तटकरे, संजय बनसोडे, अनिल भाईदास पाटील यांनी मंत्री मंडळाची शपथ घेतली. अजित पवार यांच्या पत्रावर राष्ट्रवादीच्या 29 आमदारांनी सह्या केल्या असून आणखी काही आमदार सोबत येणार असल्याचा दावा त्यांनी केला आहे.
१. दिलीप वळसे पाटील
२. हसन मुश्रीफ
३. छगन भुजबळ
४. किरण लहमाटे
५. निलेश लंके
६. धनंजय मुंडे
७. रामराजे निंबाळकर
८. दौलत दरोडा
९. मकरंद पाटील
१०. अनुल बेणके
११. सुनिल टिंगरे
१२. अमोल मिटकरी
१३. अदिती तटकरे
१४. शेखर निकम
१५. निलय नाईक
१६. अशोक पवार
१७. अनिल पाटील
१८. सरोज अहिर
१९. नरहरी झिरवळ
२०. प्रविण पवार
२१. दिलीप बनकर
२२. माणिकराव कोकाटे