Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

MaharashtraPoliticalUpdateLive : सर्वात मोठी बातमी ! अजित पवार यांनी घेतली उपमुखमंत्रीपदाची शपथ

Spread the love
  • शपथविधी संपला…

  • अनिल पाटील यांनी घेतली शपथ
  • संजय बनसोडे यांनी घेतली शपथ
  • अदिती तटकरे यांनी घेतली शपथ
  • धर्मराव आत्राम यांनी घेतली शपथ
  • धनंजय मुंडे यांनी घेतली शपथ
  • हसन मुश्रीफ यांनी घेतली शपथ
  • दिलीप वळसे पाटील शपथ घेत आहेत.
  • छगन भुजबळ यांनीही घेतली शपथ
  • अजित पवार यांनी घेतली उपमुखमंत्रीपदाची शपथ 

मुंबई : राज्याच्या राजकारणात कधी काय घडेल सांगता येत नाही .आता बातमी अशी आहे की , गेल्या काही दिवसांपासून नाराज असलेले राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते अजित पवार अचानक राजभवनात दाखल झाले आहेत. त्यांच्यासोबत राष्ट्रवादीचे अनेत नेतेही उपस्थित आहेत. मीडिया रिपोर्टनुसार, अजित पवारमहाराष्ट्राच्या सत्तेत सामील होणार असून, उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे.यावर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार किंवा कुणाचीही प्रतिक्रिया आली नव्हती . अजित पवार उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार अशी माहिती असून अजित पवार यांच्यासोबत 30 आमदार असल्याची माहिती आहे. राष्ट्रवादीचे एकूण 9 आमदार मंत्रीपदाची शपथ घेतील असे सांगण्यात येत आहे.

 छगन भुजबळ अजित दादांसोबत

राष्ट्रवादी काँग्रेसचे महाराष्ट्रात एकूण 54 आमदार आहेत. त्यातल्या 30 ते 40 आमदारांचा अजित पवार यांना पाठिंबा आहे. छगन भुजबळ हे अजित पवारांसोबत कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेतील, अशी माहिती आहे. काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी कार्याध्यक्षपदी प्रफुल्ल पटेल यांची निवड केली होती. ते सुद्धा अजित पवारांसोबत आहेत. सध्या प्रफुल्ल पटेल, छनग भुजबळ आणि धनंजय मुंडे हे राजभवनात असल्याची माहिती आहे. राजभवनात शपथविधीची तयारी सुरु आहे. दिलीप वळसे पाटील हे राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांचे निकटवर्तीय समजले जातात. त्यांना मंत्रीपद दिलं. पण ते सुद्धा अजित पवारांसोबत आहेत. महाविकास आघाडीचे सरकार पडल्यानंतर नरहरी झिरवळ चर्चेत होते. ते सुद्धा अजित पवारांसोबत आहेत.

विशेष म्हणजे, राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे राजभावनात दाखल झाले आहेत, तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांसह भाजप आणि शिंदे गटाचे नेतेही राजभवनाच्या दिशेने निघाले आहेत. याशिवाय, भाजप आणि राष्ट्रवादीचे काही नेते आधीपासूनच राजभवनात दाखल झाले आहेत. आज अजित पवार उपमुख्यमंत्रिपदाची तर राष्ट्रवादीचे इतर काही नेते मंत्रिपदाची शपथ घेणार असल्याची चर्चा आहे. आज अजित पवार यांनी राज्यातील सर्व आमदार आणि जिल्हाध्यक्षांना मुंबईत बैठक घेतली होती परंतु या मागची भूमिका त्यांनी गुलदस्त्यात ठेवली होती.

शरद पवार यांची सावध भूमिका

अजित पवार यांच्या बैठाकीबाबत बोलताना पायावर म्हणाले होते की . “अजित पवारांनी जी बैठक बोलावली ती आमदारांची बैठक असेल. कारण विरोधी पक्षनेतेपद अजित पवारांकडे आहे. त्यामुळे त्यांच्या त्या बैठका होतच असतात. ६ जुलैच्या बैठकीत पक्षातील प्रमुख लोकांना मी निमंत्रित केलं आहे.” या बैठकीत पक्षाची भूमिका ठरवू . अजित पवार यांच्या भूमिकेविषयी साशंकता असल्यामुळेच बहुदा दिल्ली येथील पक्षाच्या अधिवेशनात अजित पवार यांच्यावर पक्षाची कुठलीही जबाबदारी शरद पवार यांनी दिली नव्हती.

  • राष्ट्रवादीचे नेते आणि विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी आपल्या विरोधी पक्षनेतेपदाचा राजीनामा दिला आहे. राज्यपालांना भेटून अजितदादांनी राजीनामा सुपुर्द केला आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!