Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

MaharashtraPoliticalUpdate : अजित पवार गटाकडून प्रदेशाध्यक्षपदावरून जयंत पाटील यांची हकालपट्टी , तटकरे यांची निवड

Spread the love

मुंबई : शिंदे – फडणवीस सरकारमध्ये उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेताच आज एका पत्रकार परिषदेत अजित पवार यांच्या गटाकडून जयंत पाटील यांची प्रदेशाध्यक्ष पदावरून हकालपट्टी करण्यात आली आहे. जयंत पाटील यांच्याऐवजी सुनिल तटकरे यांना प्रदेशाध्यक्ष करण्यात आलं आहे. दुसरीकडे जयंत पाटील यांनी शपथ घेतलेल्या ९ मंत्र्यांना अपात्र करावं यासाठीची नोटीस विधानसभा अध्यक्षांना पाठवली आहे, तर अजित पवार यांनीही जयंत पाटील आणि जितेंद्र आव्हाड यांना अपात्र करण्यासाठीची नोटीस विधानसभा अध्यक्षांना पाठवली आहे.

दरम्यान शरद पवार यांनी कार्यकारी अध्यक्ष असलेल्या प्रफुल पटेल यांना निलंबित केलं आहे, तुम्हीही कार्यकारी अध्यक्ष असलेल्या सुप्रिया सुळेंना निलंबित करणार का? असा प्रश्न विचारण्यात आला. तेव्हा हकालपट्टी करण्याकरता आमचा पक्ष चाललेला नाही. बेरजेचं राजकारण आम्ही करत आहे, बेरजेचं राजकारण आम्ही करत आहे. इकडे आम्ही हकालपट्टी करायला बसलो का? असं उत्तर अजित पवारांनी दिलं आहे.

पवार पुढे म्हणाले की , त्यांनी आमच्या ९ जणांना नोटीस पाठवली आहे, त्यांना नोटीस काढण्याचा अधिकार नाही. पक्ष आणि चिन्ह आमच्याबरोबर आहे, असा आमचा ठाम विश्वास आहे. आमच्याबरोबर जे आमदार आहेत त्यांचे भवितव्य व्यवस्थित कसे राहिल, याची खबरदारी आम्ही घेत आहोत.

रात्री १२ -१२ वाजता प्रेस हे काय चाललंय ?

पक्षाच्या खासदार आणि कार्यकारी अध्यक्ष सुप्रिया सुळे आणि जयंत पाटील यांनी रात्री १२ वाजता पत्रकार परिषद घेतल्याबद्दल टीका करताना अजित पवार म्हणाले की , काही मान्यवरांची वक्तव्य आली होती, आम्ही कायद्यामध्ये न जाता जनतेमध्ये जाऊ. पण काल रात्रीपासून वेगळ्या घटना घडल्या. रात्री बारा वाजता प्रेस कॉन्फरन्स घेऊन वेगळ्या घटना सांगितल्या जात आहेत, हे काय चाललंय ? त्याला काहीही अर्थ नाही. आमची भूमिका पक्षाच्या आणि राज्याच्या भल्याची आहे, असा टोलाही अजित पवारांनी लगावला.

त्यांच्याकडे किती आमदार आहेत ? हे त्यांना विचारा …

पक्ष कुणाकडे, चिन्ह कुणाकडे हे ठरवण्याचा अधिकार निवडणूक आयोगाला आहे. आमदार आमच्यासोबत आहेत. आमदारांना निधी देण्याचं काम महायुतीचं सरकार चांगल्या पद्धतीने करेल. बहुसंख्य आमदार आमच्यासोबत आहेत म्हणून अजित पवार इकडे उपमुख्यमंत्री म्हणून आहे, असे जेंव्हा अजित पवार म्हणाले तेंव्हा तुमच्यासोबत किती आमदार आहेत ? त्यांची संख्या किती ? याविषयी विचारले असता , पवार आणि पटेल म्हणाले की , हे आता त्यांना विचार की, त्यांच्यासोबत किती आमदार आहेत. सर्व पक्ष , कार्यकर्ते , पदाधिकारी आमच्याबरोबर आहेत.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!